Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

14,000 रोजगार ते रेल्वे विकास अन् EV हब! मुक्तिसंग्राम दिनी मुख्यमंत्री काय म्हणाले? वाचा 5 मुद्यात

Marathwada Muktisangram Din 2025 devendra fadanvis speech : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आज १७ सप्टेंबर २०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी, त्यांनी मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले आणि मराठवाड्यातील औद्योगिक विकास-रोजगारासाठी प्रयत्न, दुष्काळमुक्ती, रेल्वे विकास यावर भाष्य केले.

मुख्यमंत्री फडणवीसांनी आपल्या भाषणा इलेक्ट्रिक व्हेईकलचे हब म्हणून छत्रपती संभाजीनगर बनत असल्याचे स्पष्ट करत मराठवाड्यातील स्वातंत्र्यसंग्रामात लढा देणाऱ्या, आहुती देणाऱ्यांना नमन करुन ध्वजारोहण केले.

Marathwada Muktisangram Din 2025

१. मराठवाड्याच्या विकासासाठी अथकपणे काम करण्याची ग्वाही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितले की, मराठवाड्याच्या प्रगतीसाठी उद्योग, रोजगार, कृषी आणि पायाभूत सुविधा यांसारख्या सर्व क्षेत्रांमध्ये अथकपणे काम केले जाईल. त्यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना आदरांजली वाहिली आणि त्यांच्या योगदानाचा गौरव केला. छत्रपती संभाजीनगर हे इलेक्ट्रिक व्हेईकलचे भारतातील सर्वात मोठे हब होत आहे, या माध्यमातून मराठवाड्याचा विकास साधला जाईल.

२. दुष्काळमुक्तीसाठी जलव्यवस्थापनाचे मोठे प्रकल्प

मराठवाड्यातील दुष्काळ कायमचा संपवण्यासाठी कृष्णा खोऱ्यातील पाणी मराठवाड्यापर्यंत आणले आहे. आता दुसऱ्या टप्प्यात सांगली-कोल्हापूरचे पुराचे पाणी उजनीपर्यंत आणून ते मराठवाड्याला देण्याची योजना आहे. तसेच, उल्हास खोऱ्यातील ५४ टीएमसी पाणी देखील मराठवाड्यात आणले जाईल. गोदावरी खोऱ्यातील पाण्याची तूट भरून काढण्यासाठी जलव्यवस्थापनाचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

३. २०२३ च्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांची अंमलबजावणी

छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी वेगाने होत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले...

  • घृष्णेश्वर मंदिरासाठी ६१ कोटी आणि तुळजाभवानी मंदिरासाठी ५४१ कोटींची तरतूद.
  • मानव विकास कार्यक्रमांतर्गत ९४ बस आणि छत्रपती संभाजीनगरसाठी ११५ बसेस दिल्या आहेत.
  • ९१६ अंगणवाड्या सुरू केल्या आणि २६,५०० नवीन बचत गट तयार करून २.७० लाख महिलांना जोडले.
  • ३,१२१ कोटी रुपयांच्या रस्त्यांची कामे सुरू झाली आहेत.
  • ४ लाख सिंचन विहिरींपैकी ३०,००० पूर्ण झाल्या, तर १.१४ लाख विहिरींचे काम सुरू आहे.

४. १४,००० लोकांना रोजगार, औद्योगिक विकासाला चालना

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, समृद्धी महामार्ग आणि डीएमआयसी (Delhi-Mumbai Industrial Corridor) मुळे छत्रपती संभाजीनगर आता गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाचे ठिकाण बनले आहे. ह्युंडाई सारख्या कंपन्यांची गुंतवणूक हेच दर्शवते. काही वर्षांत हे शहर इलेक्ट्रिक वाहनांसाठी देशाची राजधानी बनेल. लातूरमधील कोच फॅक्टरीचे काम अंतिम टप्प्यात असून, तिथे १४,००० लोकांना रोजगार मिळेल.

Take a Poll

५. रेल्वे आणि इतर पायाभूत सुविधांचा विकास

अहिल्यानगर ते बीड रेल्वे मार्ग पूर्ण करण्याचे स्वप्न साकार होत असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. तसेच, छत्रपती संभाजीनगर शहरासाठी २,७०० कोटी रुपयांची पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर केली असून, महानगरपालिकेचा ८०० कोटींचा हिस्सा देखील भरण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+