मनोज जरांगेचे एकाच मुद्द्यावरुन दोघांवर निशाणा! आरक्षण रद्द करायला राहुल गांधींचं सरकार तर यावं
Maratha reservation : राज्यात एकीकडे मराठा आरक्षणावरुन रणकंदण माजलं असतानाच लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस खासदार, नेते राहुल गांधी यांनी आरक्षणावरुन केलेल्या वक्तव्यानंतर आता मराठा आरक्षणकर्ते मनोज जरांगे यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. देशातील आरक्षण रद्द करण्यासाठी राहुल गांधींचे आधी सरकार तर यायला हवं असं म्हणत जरांगे यांनी त्यांना टोला लगावला आहे.
तर दुसरीकडं मनोज जरांगे यांनी राज्यातील महायुती सरकारवरही रडके असल्याचे वक्तव्य केलं असून त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि राजेंद्र राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले होते राहुल गांधी?
युएसएमध्ये भाषण देताना राहुल गांधी यांनी देशातील आरक्षण संपवण्यासंदर्भात भाष्य केलं आहे. त्यात त्यांनी भारतातील सर्व जातींसाठी न्याय ठिकाण झाल्यानंतरच आरक्षण रद्द करता येईल असे म्हटले आहे. पण त्यावरुन आता सत्ताधाऱ्यांनी त्यांना लक्ष्य केलं आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे?
मनोज जरांगे म्हणाले की, राहुल गांधींनी आरक्षण संपवण्यासंदर्भात जेही वक्तव्य केलं त्याबद्दल ते परदेशात बोलले की समुद्रात उभे राहून बोलले हे माहीत नाही. त्यांची सत्ता येण्यापूर्वीच ते कुठून आरक्षण रद्द करणार? हा त्यांचा राजकीय मामला असल्याचं म्हणत जरांगे पाटलांनी राहुल गांधींच्या भूमिकेवर टीका केली.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका
मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस फारच हुशार राजकारणी आणि चाणक्य आहेत असे मला वाटत होते, पण ते फक्त फोडाफोडीतच हुशार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मी त्यांना अजून आपला विरोधक किंवा शत्रू मानले नाही. पण त्यांनी आम्हाला आरक्षण दिले पाहिजे, असंही जरांगे यांनी अपेक्षा व्यक्त केली.
17 सप्टेंबरपासून पुन्हा आमरण उपोषण
मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं की, आपला आरक्षणाचा निर्णय झाला असून 17 सप्टेंबरपासून पुन्हा आमरण उपोषण करणार आहोत. त्यासाठी आपण कुणाची वाट पाहत नसतो, थेट उपोषणाला बसतो.
राजेंद्र राऊतांचा समाचार
मनोज जरांगे आणि आमदार राजेंद्र राऊत यांच्यात सध्या वाद पेटला आहे. त्यावर मनोज जरांगे यांनी म्हटलं की, देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशांनुसार सरकारी आंदोलने सुरू आहेत. राजेंद्र राऊत यांना देवेंद्र फडणवीस यांच्या जिवावर मस्ती आली आहे. त्यांचे दिवस जवळ आलेत, समाज त्यांचा हिशेब घेईल. राजकीय पक्षाला बाप मानणारे असे किती आले आणि गेले, असे म्हणत आमदार राजेंद्र राऊत आणि प्रसाद लाड यांच्यावर जरांगे पाटलांनी टीका केली. आमदार लाड थोड्याच दिवसांत वेडे होतील, असेही ते म्हणाले.
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications