मराठा-ओबीसी समाजात महायुतीनेच तेढ निर्माण केली! काँग्रेसच्या 'या' नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई : मराठा आणि ओबीसी समाजात महायुतीने तेढ निर्माण केले आहे. त्यांचे पितळ उघडे पडू नये म्हणून तेच आता थयथयाट करीत असल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
सरकार जनतेला अंधारात ठेवतेय
आरक्षणाचा प्रश्न या सरकारला सोडवायचा नाही. हे आता स्पष्ट झाले आहे. सरकारने सभागृहात भूमीका स्पष्ट करणे अपेक्षित आहे. त्यामुळे जनतेला आरक्षणाबाबतची माहिती मिळू शकते. परंतु सरकारला जनतेला अंधारात ठेवायचे आहे. म्हणून आरक्षण प्रश्नावर सरकार सभागृहात बोलत नाही असेही वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

महायुतीने सत्ता सोडावी
विजय वडेट्टीवार म्हणाले, खरं तर आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याची या सरकारची इच्छाशक्ती नाही. त्यामुळे महायुतीने सत्तेतून बाहेर पडावे, अशा शब्दात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
आम्ही भ्रष्टाचार उघड करतोय
विजय वडेट्टीवार म्हणाले, सरकारने आंदोलकांना काय आश्वासन दिले हे महाविकास आघाडीच्या नेत्यांना सांगितले नाही. मुख्यमंत्री अधिवेशन सुरू असताना आरक्षणप्रश्नी बैठक बोलावतात. त्यापेक्षा त्यांनी भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांना आम्ही वाचा फोडत आहोत. त्यामुळे गोंधळ घालून काम बंद पाडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
मविआच्या नेत्यांना बोलू देत नाही
विजय वडेट्टीवार म्हणाले, महायुतीचे पितळ उघडे पडेल या भीतीने महाविकास आघाडीच्या नेत्यांना बोलू दिले जात नाही. अपयश लपवण्यासाठी सरकारचा हा थयथयाट सुरू आहे. महायुतीत 200 च्यावर आमदार आहेत. तरी देखील आरक्षाचा प्रश्न महायुती सरकार सोडवत नाही. उलट सभागृहात गोंधळ घालून कामकाज बंद पाडले जात आहे. विरोधी पक्षाला सभागृहात बोलू दिले जात नाही.
आरक्षणप्रश्नी बैठकीवर मविआचा बहिष्कार
मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरील सर्वपक्षीय बैठकीवर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकला. त्यामुळे आज विधानसभेत गदारोळ झाला. कुणाचा फोन आल्यामुळे विरोधकांनी ऎनवेळी बैठकीवर बहिष्कार टाकला, हे उघड व्हायला हवे अशी मागणी करत सत्ताधारी आमदारांनी विरोधकांना सवाल केला.
सत्ताधारी आमदारांची घोषणाबाजी
मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरील सर्वपक्षीय बैठकीवर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकल्याने या मुद्दयांवर विरोधकांना केवळ राजकारण करायचं आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीवर विरोधकांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करत सत्ताधारी आमदारांनी विधानसभेत जोरदार घोषणाबाजी केली.या घोषणाबामुळे नंतर सभागृह दहा मिनिटांसाठी, नंतर पाऊणतास आणि वीस मिनिटांसाठी कामकाज तहकूब करावे लागले.












Click it and Unblock the Notifications