Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Manoj Jarange's hunger strike : मनोज जरांगेंचे पुन्हा उपोषणास्त्र! सरकारला 29 सप्टेंबरपर्यंत वेळ

Manoj Jarange's hunger strike :मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आरक्षणाचं हत्यार उपसलं आहे. येत्या 29 सप्टेंबरपासून ते आपल्या गावी अतंरवाली सराटी इथं आमरण उपोषण करणार आहेत. हे त्यांनी आज अंतरवाली सराटी इथं जाहीर केलं.

मनोज जरांगे यांनी ्मागील काही दिवसांपुर्वी आपलं आमरण उपोषण थांबवलं होतं. जर सलाईन लावून उपोषण करायचंच असेल तर अशा उपोषणाचा उपयोग नाही असं म्हणत त्यांनी आपलं उपोषण थांबवलं होतं परंतु आता पुन्हा मनोज जरांगे यांनी आरक्षणाचं हत्यार उपसलं आहे.

Manoj Jarange s hunger strike

123 गावांच्या आंदोलक समन्वयकांची बैठक

ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी म्हणून जरांगे यांनी गतवर्षी २९ ऑगस्ट २०२३ रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमधून आंदोलन सुरू केलं होतं. या आंदोलनाची वर्षपूर्ती झाल्याच्या निमित्ताने जरांगे यांनी गोदापट्ट्यातील 123 गावांच्या आंदोलक समन्वयकांची आज आंतरवाली इथं बैठक बोलावली होती. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं.

काय म्हणाले मनोज जरांगे?

मनोज जरांगे म्हणाले की,जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत हे (Manoj Jarange's hunger strike)उपोषण सुरूच राहणार असं त्यांनी यावेळी सांगितलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावही जरांगे यांनी यावेळी टीका केली. दरम्यान, जरांगे यांच्या आमरण उपोषणाच्या या निर्णयाला उपस्थित समाजबांधवांनी विरोध करत उपोषणाचा निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती यावेळी केली.

सरकारला वठणीवर आणू

मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं की, आपण थांबून चालणार नाही आरक्षणाचा लढा तीव्र करावा लागणार आहे. राज्यातील सरकारला वठणीवर आणायची गरज असुून सरकार निवडणुकांना घाबरत नाही आणि रस्त्यावरच्या आंदोलनालाही भीत नाही.

सरकारला 29 सप्टेंबरपर्यंत वेळ

मनोज जरांगे म्हणाले, आपण सरकारला 29 सप्टेंबरपर्यंत वेळ देऊ. तोपर्यंत सरकारने आरक्षण दिले तर ठीक नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील समाज येथे आंतरवाली सराटीत येऊन उपोषणाला बसेल, असे मनोज जरांगे म्हणाले.

113 आमदार पाडू

मनोज जरांगे म्हणाले, आता सरकार दिलेल्या मुदतीत काय करते हे पाहू. आपण निवडणुकीतही पाडू. त्यांचे 113 आमदार पाडू म्हणजे पाडूच. आपल्या जातीचे कल्याण केल्याशिवाय आता आपल्याला शांत बसायचे नाही. आता ही आरपारची लढाई आहे. जे होईल ते होईल.

फडणवीसांना धडा शिकवू

मनोज जरांगे म्हणाले, महाराष्ट्रात येत्या एक महिन्यात मी दौरा करणार आहे. सर्वच जिल्हे व तालुके पिंजून काढण्यात येईल. देवेंद्र फडणवीस यांना मराठा समाजाबद्दल कळवळा नाही, त्यामुळे त्यांना आपल्याला या निवडणुकीत धडा शिकवायचा आहे असाही इशारा त्यांनी दिला.(Manoj Jarange's hunger strike)

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+