Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'एकाही मराठा तरुणाला धक्का लागला, तर अख्खं राज्य बंद पाडू'; जरांगेंचा गंभीर इशारा

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे आणि सगेसोयरे अध्यादेश लागू करावा, या प्रमुख मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. येत्या २९ ऑगस्टला मुंबईत विराट मोर्चा काढण्याचे आवाहन त्यांनी मराठा समाजाला केले आहे. सध्या मराठवाड्यात संवाद दौरा करत असताना परभणी येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी थेट राज्य सरकार आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

manoj jarange warns maharashtra government


फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप

परभणीतील एका कार्यक्रमात मनोज जरांगे पाटील यांनी बोलताना म्हटले की, 'देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाविरुद्ध षडयंत्र रचत आहेत.' काही दिवसांपूर्वी फडणवीस यांनी गोव्यात जाऊन ओबीसी नेत्यांची भेट घेतली आणि तिथेच मराठा आंदोलनादरम्यान राज्यात दंगल घडवण्याचा कट रचल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केला. 'याची कुणकुण मला लागली असून, जर फडणवीस यांनी असं काही करण्याचा प्रयत्न केला, तर महाराष्ट्र कायमस्वरूपी बंद राहील,' असा थेट इशारा जरांगे पाटलांनी दिला.

'फडणवीसांचे विधान मराठाद्वेष सिद्ध करते'

यावेळी त्यांनी फडणवीस यांच्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले. 'तुम्ही ओबीसींसाठी लढणार असाल, तर मग मराठा समाजासाठी कोण लढणार? मराठ्यांनी तुम्हाला सत्तेत आणलं नाही का? हे विधान देवेंद्र फडणवीस यांच्या मनात मराठा समाजाबद्दल किती द्वेष आहे हे दाखवून देते,' असेही ते म्हणाले. मुंबईतील मोर्चाबद्दल विचारले असता, फडणवीसांनी 'पोलीस बघून घेतील' असे उत्तर दिले होते. यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले, 'फडणवीस म्हणजे पोलीस आणि पोलीस म्हणजे फडणवीस असे समीकरण राज्यात तयार झाले आहे. मागच्या वेळी जसे हल्ले घडवून आणले, तसे आता पुन्हा होणार आहेत का?'

जरांगे पाटील यांनी सरकारला स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे की, 'मुंबईतील आंदोलनादरम्यान एकाही मराठा तरुणाला धक्का लागला, तर संपूर्ण राज्य बंद पाडण्यात येईल.'

'या वेळी माघार नाही'

'मी कोणत्याही दबावाखाली येत नाही, त्यामुळे माझ्यावर हल्ला करण्याचा फडणवीस यांचा कट आहे,' असा आरोपही त्यांनी केला. ते म्हणाले की, २७ ऑगस्ट रोजी ते अंतरवाली सराटी येथून निघतील. मराठा समाजाला आवाहन करताना ते म्हणाले, 'यावेळी माघार घेणार नाही. आरक्षण घेऊनच परत येऊ आणि तेही ओबीसीतूनच घेऊ.'

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+