Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

जरांगे पाटलांचा दसरा मेळावा: 'महायुती सरकार ओ सरकार', मविआवर निशाणा; 10 मुद्द्यात वाचा संपूर्ण भाषण

मनोज जरांगे पाटील यांचा बीड जिल्ह्यातील नारायणगडावर दसरा मेळावा पार पडला. जरांगे पाटील यांचा हा पहिलाच मेळावा होता. यावेळी त्यांनी जोरदार भाषण करतं महाविकास आघाडी, महायुतीवर देखील गंभीर स्वरुपाचे आरोप केले. तर समाजाला आचारसंहिता लागण्यापूर्वी जर महायुतीने निर्णय घेतला नाही, तर मराठा समाजाला मोठा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा देखील त्यांनी दिला.

चला जाणून घेऊया, जरांगे पाटील यांच्या भाषणातील 10 मुद्दे...!

मराठ्यांचा एवढा द्वेष का?

गेल्या 14 महिन्यात मराठा समाजाची एकही मागणी मान्य केली नाही. एवढा द्वेष कशासाठी? आता 17 जाती घालताना गोरगरीब ओबीसींचा विचार का केला नाही का? अशी विचारणा मनोज जरांगे पाटील यांनी नारायणागडावर झालेल्या भव्य दसरा मेळाव्यातून केली.

Manoj Jarange Patil

आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही

जरांगे पाटील यांनी शड्डू ठोकत आरक्षण घेतल्याशिवाय माघार हटणार नसल्याचा इशारा दसरा मेळाव्यातून दिला. मनोज जरांगे पाटील यांनी दसरा मेळाव्यातून कोणतीही राजकीय घोषणा करण्याचे टाळले, पण आचारसंहितेपर्यंत राज्य सरकारला डेडलाईन दिली आहे. त्यानंतर महत्वाची घोषणा करणार असल्याचे ते म्हणाले.

आचारसंहिता लागेपर्यंत धीर धरा

जरांगे पाटील म्हणाले की, आचारसंहिता लागल्यानंतर मी तुम्हाला आपली मुख्य भूमिका सांगणार आहे. आचारसंहिता लागेपर्यंत धीर धरायचा आहे. सरकारला सांगतो की सुट्टी नाही. आचारसंहिता लागल्यानंतर तुम्ही सर्वांनी ऐकायचं.

मग निर्णय घ्यायचाय...!

सरकार काय करतेय ते हे सगळं पाहायचं. त्यांनी सगळं केल्याशिवाय आपण निर्णय घ्यायचा नाही. त्यांनी सगळं केल्यावर आपण निर्णय घ्यायचा. तुमच्या मनात जे आहे, ती ईच्छा पूर्ण करायची जबाबदारी माझी आहे. तुमची शान मी वाढवणारच आहे.

शेतकऱ्यांसाठी लढावं लागेल

जरांगे पाटील म्हणाले की, क्षत्रिय मराठ्यांना लढायचं शिकवलं आहे. आल्यासमोर अन्याय करणारे असतील तर समोरच्यांना उखडून फेकावंच लागणार आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आपल्याला लढावं लागणार आहे. सगळ्या जातींसाठी लढणारा हा समाज आहे.

उखडून फेकावंच लागणार

यांना उखडून फेकावंच लागणार आहे. सुट्टी नाही. आपल्यावर डोळ्यादेखत अन्याय करत असेल तर समोरच्याला उखडून फेकावंच लागेल, त्याशिवाय सुट्टी नाही. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आपल्याला लढावं लागेल.

आपला लढा सर्वांसाठी

अनुदान नाही, पिकविमा नाही, मराठा आरक्षण नाही, धनगर आरक्षण नाही, कैकाडी, महादेव कोळी, लिंगायत यांना खाऊ दिलं जात नाही. मुस्लिम आणि दलितांना काही दिलं जात नाही. आपणच सर्वांसाठी झुंजत आहोत. आपणच सर्वांना न्याय देणार आहोत, काही लोक कशासाठी भिजत आहे. आपण जातीसाठी भिजत आहोत. काय होतं त्याला. याला शुभसंकेत समजा. आता तर गाडलेच समजा, असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांना दिला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+