Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

आरक्षण मिळाले नाही तर पाडापाडी करावीच लागेल, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

छत्रपती संभाजीनगर : गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील सातत्याने उपोषण करत आहेत आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी करत आहेत. आज 27 जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर येथे रुग्णालयामध्ये उपचार घेत असून त्या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधारी आणि विरोधकांना इशारा दिला आहे.

जरांगे पाटील काय म्हणाले?

मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी मविआ-महायुतीनं एकत्रित निर्णय घेतला पाहिजे. फक्त घुमवा घुमवी नको. आरक्षण द्यायचं असेल तर काही लागत नाही. मनात असल्यावर काहीही करता येते. उगाच काही तरी सांगायचे आणि दिशाभूल करावी यात काही अर्थ नाही. एकमेकांत गैरसमज पसरवण्याचं काम आहे. मराठ्यांना आरक्षण द्यायचं की नाही हे ठरवायचंय असं सांगत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समन्वयक आणि शरद पवार यांच्या भेटीवर भाष्य केले.

Manoj Jarange Patil

आरक्षणासाठी गाठीभेटी होतच नाहीत

मराठा आरक्षणावर सरकारने पुढाकार घेऊन लाईव्ह चर्चा घडवून आणणं गरजेचे आहे. या चर्चेसाठी सत्ताधारी, विरोधकांसोबत जरांगे, लक्ष्मण हाके यांच्यासह मराठा, ओबीसी नेत्यांना बोलावावं, या चर्चेतून जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल असं शरद पवारांनी म्हटलं होतं, त्यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, लाईव्ह नव्हे तर डोंगरावर जाऊन एकमेकांशी ओरडाओरड करून चर्चा करावी पण आम्हाला आरक्षण पाहिजे. इतकं येड्यात काढायचं नाही. कोलवाकोलवी करायची नाही. आरक्षणासाठी भेटीगाठी होत नाहीत असा टोला जरांगेंनी लगावला.

तुम्हाला जे करायचे ते करा आम्हाला आरक्षण द्या

तसेच मराठ्यांना आरक्षण देणे गरजेचे आहे. आपल्याला मुर्ख कोण बनवतंय हे सहज लोकांना कळते. आधी अशिक्षितपणा होता, मात्र आता लगेच कोण कसं वागतंय हे कळतं. गोरगरिबांना न्याय द्यायचा असेल तर एकत्र यायला हवं. जातीला न्याय दिला पाहिजे. तुम्हाला जे काही करायचे करा आम्हाला आरक्षण हवं. 70-75 वर्षापासून सगळेच गोरगरिब मराठ्यांना वेड्यात काढत आहेत . लोकांच्या मनात खूप खदखद आहे.

सत्ताधारी-विरोधक गैरसमज पसरवतात

आम्ही कधीही महाविकास आघाडी, महायुती यांना विरोधक मानलं नाही. मराठ्यांची त्सुनामी उसळली आहे त्या लाटेत सर्व वाहून जाणार आहेत. माझा मराठा एक झालेला राजकीय लोकांना पचत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात मराठा एकत्र आल्याचं त्यांनी कधी पाहिलेले नाही. सत्ताधारी-विरोधक हे केवळ गैरसमज पसरवतायेत.

आपल्याला कुणी मॅनेज होत नसेल तर त्याला फसवायचे. माझ्या समाजाने तुमच्या नेत्यांच्या हमाल्या करायच्या का?, विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांचे हे समाजासाठी नाटक आहे. समाजात गोंधळ निर्माण करुन गैरसमज पसरवण्याचे षडयंत्र आहे. समाजाला वेड्यात काढण्यासाठी हा चालुपणा आहे असा आरोपही मनोज जरांगे पाटलांनी केला.

'या'नेत्यांवर नाव न घेता टीका

आम्हाला किंवा आमच्या मराठा समाजाला राजकारणात यायचे नाही आम्हाला फक्त आरक्षण हवे आहे आणि जर आरक्षण देणार नसतील तर पाडापाडी करावीच लागेल आणि जर आरक्षण दिले मराठा समाज तुम्हाला डोक्यावर घेईल असेही जरांगे म्हणाले.मागच्या दाराने येणारेच पक्ष संपवतात आणि मूळ मालकाचा कार्यक्रम लावतात अशी टीका देखील मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेदरम्यान नाव न घेता प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्यावर केली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+