Oneindia Exclusive: चाळीसगाव जिल्हा होणार? आमदार मंगेश चव्हाणांनी स्पष्टचं सांगितलं
Chalisgaon: चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांच्याशी वनइंडिया मराठीच्या टीमने खास बातचीत केली. आपल्या आमदारकीच्या कार्याकाळात केलेल्या कामांची माहिती, मतदारसंघाच्या भविष्याचा रोडमॅप काय असेल यावरही त्यांनी सविस्तर भाष्य केलं.
मतदारसंघात मोठे प्रकल्प आणण्यासाठी, विकासकामांसाठी निधी मंजूर करून आणण्यासाठी मंत्रालयात सतत पाठपुरावा करावा लागतो, एका कामासाठी तास अन् तास अधिकाऱ्यांसमोर बसून रहावे लागले तरी मी बसतो असे यावेळी आमदार चव्हाण म्हणाले.

तिजोरीचा चावीवाला मंगेश चव्हाण यांचा मित्र?
लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान मंगेश चव्हाण यांनी केलेलं एक विधान चांगलच चर्चेत आलं होत. राज्याच्या तिजोरीचा चावीवाला आपला दोस्त असून आपल्याला हवा तेवढा निधी आपण मतदारसंघात घेऊन येतो असं चव्हाण म्हणाले होते. यानंतर त्यांच्यावर चांगलीच टीका झाली होती.
मात्र या विधानाचा वेगळा अर्थ काढायची आवश्यकता नाही असं स्पष्टीकरणं चव्हाण यांनी वनइंडिया मराठीशी बोलताना दिलं. या विधानामागे माझा हेतू चांगला होता असंही ते म्हणाले.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणण किती कठीण होत?
जिल्ह्याच्याच ठिकाणी शासनानं प्रादेशिक परिवहन कार्यालय द्यावी असं सरकारच धोरण होत. १२ वर्षांत एकच कार्यालय मंजूर झालं होत. जवळपास २०० आमदारांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी पत्र लिहिल होत. मात्र कुणालाही ते मिळालं नाही. मी माझ्या फाईलचा सतत पाठपुरावा केला.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे गेलो. त्यामुळं विशेष बाब म्हणून हे कार्यालय चाळीसगावला मंजूर झालं. एवढचं नाहीतर केवळ १५ दिवसांत मी रजिस्ट्रेशन सुरू केल्याचही मंगेश चव्हाण यांनी बोलताना सांगितलं.
चाळीसगाव जिल्हा होणार?
चाळीसगाव तालुका हा चार जिल्ह्यांना जोडणारा मोठा तालुका आहे. या तालुक्यात मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळं चाळीसगाव हा जिल्हा व्हावा ही अनेक तालुकावासीयांची इच्छा आहे. यावर देखील आमदार मंगेश चव्हाण यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, जिल्हानिर्मितीसाठी काही निकष असतात. तेवढ्यात निकषात तालुका बसायला हवा.
त्यामुळं ही बाब लक्षात घेऊन आपण आतापासूनच तालुक्यात या सगळ्या सुविधा उपलब्ध करून देत आहोत. सगळे निकष पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्नशील. ज्या दिवशी महाराष्ट्रात नवीन जिल्हे निर्माण होतील त्यादिवशी चाळीसगाव हा जिल्हा झालेला असेल असा विश्वास मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केला. यावेळी मंगेश चव्हाण यांनी तालुक्याच्या भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या प्रकल्पांवरही प्रकाश टाकला. येणाऱ्या काळात ही सगळी काम पूर्णत्वास नेणार असून तालुक्याच्या विकासासाठी कटीबद्ध असल्याच ते म्हणाले.












Click it and Unblock the Notifications