'महाराष्ट्रात जनतेचा कौल फक्त महायुतीच्या कामालाच!" महायुतीच का जिंकतेय? वाचा विश्लेषण
Mahayuti victory analysis : राज्यात निवडणूक आली की महायुतीला निर्भेळ यश मिळतेच मिळते.. पण महायुतीच का जिंकतेय? या प्रश्नाचं उत्तर शोधायचं झाल्यास आपल्याला इथून साधारण एक वर्षभर मागे जावं लागेल. लोकसभा निवडणुकीतील आपल्या खराब कामगिरी नंतर महायुतीने कंबर कसली आणि त्यानंतर काहीच महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत २३५ जागा जिंकून अभूतपूर्व विजय मिळवला. त्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महायुतीला मोठं यश मिळालं. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची गाडी मात्र ५० जागांवरच अडलेली दिसली. त्यांच्या याच कामगिरीमुळे महाराष्ट्र गेल्या ६० वर्षांत पहिल्यांदा विरोधीपक्षनेतेपदाला मुकला.

आताच झालेल्या नगरपालिका निवडणुकीला तर ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने एकप्रकारे बाय दिला असल्याचं चित्र होतं. ठाकरेंनी ही निवडणूक भावकी आणि गावकीतील निवडणूक म्हणत गांभीर्याने घेतलीच नव्हती. याचाच परिणाम त्यांना दारुण पराभवाचा सामना करत फक्त ९ जागांवर समाधान मानावे लागले. आपल्या अस्तित्वाची लढाई सुरु असताना स्थानिक स्वराज्य संस्थांना बाय देणारे नेते एकीकडे आणि देशात तसेच राज्यात अशी डबल इंजिन सत्ता असूनही जंग जंग पछाडणारे महायुतीचे नेते एकीकडे.
थेट संवाद विरुद्ध तुटकपणा
भाजपा आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची यांची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांचा कार्यकर्त्यांशी असलेला वैयक्तिक संवाद. लोकांमध्ये उतरून काम करणं, कार्यकर्त्यांना भेटणं, २४/ ७ लोकांसाठी उपलब्ध असणं या बाबी पक्षबांधणी साठी मोलाच्या ठरतात पण ठाकरे गटात मात्र अनेकदा 'मातोश्री' किंवा निवडक नेत्यांभोवती फिरणारे राजकारण दिसते, जिथे सामान्य कार्यकर्त्याला पोहोचणे कठीण असते. त्याचाच परिणाम म्हणून कार्यकर्ते दुरावले जातात आणि पक्ष कमकुवत होत जातो. याउलट, ठाकरेंपासून वेगळे झाल्यानंतर मुख्यमंत्री होऊनही शिंदे यांनी 'सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री' ही प्रतिमा जपली. कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याची जुनी शिवसैनिक पद्धत कायम ठेवली. याच 'कनेक्ट'मुळे त्यांचा यशस्वी 'मायक्रो-मॅनेजमेंट' पॅटर्न आता संपूर्ण महाराष्ट्रात, अगदी नगरपंचायत स्तरापर्यंत पोहोचला आहे.
सभांचा सपाटा विरुद्ध दुर्लक्ष
स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक जाहीर झाल्यापासून महायुतीचे नेते असे काही कामाला लागले की महायुतीच्या घटक पक्षांचीच ही निवडणूक आहे. इतके विरोधी पक्षातील नेते थंड होते. उद्धव ठाकरे एकाही उमेदवारासाठी ना सभा घेताना दिसले,ना प्रचार रॅलीत सहभागी होताना दिसले. ठाकरे गटाचे नेतृत्व हे प्रामुख्याने मुंबईतील पत्रकार परिषदा आणि फेसबुक लाईव्हपुरतेच मर्यादित राहिल्याचे चित्र दिसले. महायुतीकडून त्यांच्यावर 'आपल्या उमेदवारांना वाऱ्यावर सोडल्याची टीकाही झाली.
महायुतीच्या नेत्यांनी मात्र सभांचा धडाका लावला, एकनाथ शिंदे यांनी तर १० दिवसांत ५३ सभा घेतल्या दिवसाला ४-५ सभा, रात्री उशिरापर्यंत कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आणि प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून केलेले शक्तिप्रदर्शन यामुळे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला. निवडणुकीच्या रणधुमाळीत जो नेता लोकांच्या दारात पोहोचतो, त्यालाच जनता कौल देते, हे या निकालांनी पुन्हा सिद्ध केले.
संघटनात्मक कौशल्य की केवळ भावनिक साद?
महायुतीच्या नेत्यांनी फक्त भाषणे केली नाहीत, तर महायुतीने केलेली विकासकामे लोकांपर्यंत पोहचवली. एकनाथ शिंदे भरसभेत कॉलवरून स्थानिकांचे प्रश्न सोडवताना दिसले. स्थानिक पातळीवरील प्रभावी नेत्यांना आपल्याकडे वळवणे, नाराज कार्यकर्त्यांचे मनधरनी करणे आणि निवडणुकीच्या तांत्रिक बाजू सांभाळणे यात महायुती आघाडीवर राहताना दिसली. ठाकरे गटाकडे आजही मराठी भाषा आणि भावनिक आवाहन हाच मुख्य आधार आहे, परंतु प्रत्यक्ष निवडणूक जिंकण्यासाठी लागणारी यंत्रणा आणि संघटनात्मक बांधणी करण्यात ते कमी पडताना दिसत आहेत.
ईव्हीएम विरुद्ध मैदानावरील मेहनत
महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीतील अपयशाचं खापर ईव्हीएमवर फोडलं. काँग्रेस नेते राहुल गांधींनी 'वोट चोरीचा' मुद्दा घेऊन राष्ट्रीय अजेंडा राबवला. त्याचीच पुनरावृत्ती ठाकरे गट आणि मनसेकडून महाराष्ट्रात झाली.नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीत अपयश आल्यानंतर ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा ईव्हीएमवर संशय व्यक्त केला गेला. मात्र, तथ्य हे आहे की, आपण कितीही मेहनत केली तरी ईव्हीएममुळे आपण हरणार हा नकारात्मक संदेश कार्यकर्त्यांमध्ये गेला आणि त्यांनीही हातपाय गाळले. म्हणून ईव्हीएमविरुद्धच्या नेरेटिव्हचा महाविकास आघाडीचा तोटा तर झालाच पण उलट महायुतीचा फायदा झाला. कारण महायुतीचे नेते रस्त्यावर उतरून घाम गाळत होते, विकासकामांचा पाढा वाचत होते.
लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही असा शब्द देत होते. त्याचाच परिणाम निकालांवर झाला आणि जनतेचा महायुतीवरचा विश्वास वाढू लागल्याचं चित्र स्पष्ट झालं. मतदारांच्या मते, ईव्हीएमवर दोष देणे ही आता पराभूत मानसिकतेची लक्षणे वाटू लागली आहेत.
सारांश
थोडक्यात काय तर... जनतेला आता फक्त नॅरेटिव्ह किंवा भावनिक साद नकोय. त्यांना तुम्ही आमच्यासाठी काय करत आहात? किंवा करणार आहात? याची श्वाश्वती, विश्वास आणि विकास हवा आहे. हीच गोष्ट हेरून महायुतीने आपली रणनीती आखली असल्याने कदाचित हेच त्यांच्या यशाचं गमक आहे.
-
बिहारमध्ये 'निशांत' पर्व?, CM नितीश कुमार यांच्या मुलाची राजकीय एंट्री, 50व्या वर्षीही अविवाहित का? -
IND vs ENG: हारता हारता जिंकला भारत! मॅजिक ओव्हर, 6 बॉलमध्येच इंग्लंडचा गेम; 'हा' खेळाडू ठरला हिरो -
IND vs ENG Semifinal : आज भारत-इंग्लंडमध्ये सेमीफायनल; मॅच कुठे पाहू शकता Live, वाचा सर्व डिटेल्स -
Nitish kumar resigns : मोठी बातमी! नितीशकुमार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार; काय आहे कारण? वाचा -
शिंदेंचं सोलापूर 'कार्ड' अन् आंबेडकरी चेहऱ्याला संधी; राज्यसभेत ज्योती वाघमारेंना संधी, वाचा सविस्तर -
बिहारच्या राजकारणात 'नितीश' युगाचे नवे पाऊल; राज्यसभेच्या रिंगणात CM, शहांनी फुंकले विजयाचे रणशिंग! -
भारताला तेल खरेदी करण्यासाठी कोणाच्याही 'परवानगी'ची गरज नाही, विषय संपला ! -
IND vs NZ Final: भारत रचणार इतिहास! फायनलमध्ये 'या' 2 स्टार खेळाडूंचा पत्ता कट होणार? कारण काय, वाचा -
महाराष्ट्राला मिळाले नवे राज्यपाल! जिष्णू देव वर्मा यांच्याकडे राज्याची धुरा; वाचा त्यांच्याबद्दल -
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! 'एवढ्या' लाखांचे कर्ज माफ होणार! काय स्वस्त काय महाग यादी पहा -
Women's Day 2026: केवळ मेसेज नको, द्या 'हे' खास सरप्राईज! महिला दिनासाठी स्वस्त 5 हटके गिफ्ट आयडियाज -
Mumbai Heatwave Alert : मुंबईकरांनो सावधान! मार्चमध्येच तापमान वाढले; 'या' जिल्ह्यांना IMDचा इशारा






Click it and Unblock the Notifications