महाराष्ट्राची जनता 'फेक नॅरेटीव्ह' नाकारणार, महायुतीला विजयी करणार- श्रीकांत शिंदे यांचा ठाम विश्वास
Maharashtra will reject fake narrative : लोकसभेवेळी फेक नरेटीव्हचा वापर महाविकास आघाडीने महाराष्ट्रात केला, त्यानंतर हरियाणात हाच प्रयोग इंडिया आघाडीने राबवला पण फेक नॅरेटीव्ह तिथे चालले नाही, म्हणजेच फेक नॅरेटीव्ह आता चालणार नसून जनताही सुज्ञ आहे. कुणी काम केले आणि कुणी कामे बंद पाडली हे जनतेला चांगलेच माहित आहे. त्यामुळे या निवडणुकीत फेक नॅरेटीव्हचा वापर कितीही विरोधकांनी केला तरीही महायुती जनहिताच्या कामांच्या जोरावर आणि कल्याणकारी योजनांच्या बळावर पुन्हा जिंकून येणार आहे. असाच काहीसा विश्वास श्रीकांत शिंदे हे व्यक्त करतात.
श्रीकांत शिंदे यांनी काही लोक फेक नॅरेटीव्हचा वापर करत असल्याचे म्हटले आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याविषयी भाष्य केले आहे. विरोधकांच्या नॅरेटीव्हला हरियाणातील जनतेने थारा दिला नाही तसा महाराष्ट्रात विरोधकांनी जनतेची कितीही दिशाभूल केली. फेक नॅरेटीव्हद्वारे प्रचार केला तरीही त्यांना उपयोग होणार नाही. कारण जनता अशा फेक नॅरेटीव्हला नाकारत आली आहे.

फेक नॅरेटीव्ह होणार फेल
महायुतीचे लक्ष विकासाचे राजकारण, उपलब्धी दाखवण्यावर आहे. विरोधक केवळ ओरड करतात आणि योजना बंद पाडतात पण महायुती सरकार आपले काम जनतेला दाखवत आहे, सरकार आपल्या दारी सारखे उपक्रम राबवून लोकप्रश्नांची उकल महायुती सरकारने आतापर्यंत केली त्यामुळे महायुतीला जनतेचा वाढता प्रतिसाद आहे आणि विधानसभा निवडणुकीतही महायुतीला जनतेचा भरघोस पाठींबा मिळेल आणि महायुती सत्तेत येईल. लोकसभा निवडणुकीच्या निकालाची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होणार नाही, यावर श्रीकांत शिंदे यांनी आपल्या मुलाखतीत भर दिला आहे.
जे केले ते जनतेपर्यंत पोहचवले
महायुती सरकारच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा एकनाथ शिंदेसारख्या धुरंधर आणि बलशाली नेत्यांच्या खांद्यावर आहे. विकासकामाची आवड आणि जनतेचे प्रश्न सोडवणारा जनतेसाठी दिवसरात्र एक करणारा आणि शेतबांधावर जावून शेतकऱ्यांचे अश्रू पुसणारा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची ओळख आहे. ही त्यांच्या कामातून निर्माण झालेली ओळख आहे आणि त्यामुळेच लोकांचा जनाधारही त्यांना मिळाला. आधी केले मग सांगितले अशा उक्तीनुसार एकनाथ शिंदे आणि त्यांचे सरकारने जे - जे निर्णय घेतले. ज्या - ज्या योजना आणल्या त्या लोकांपर्यंत नेल्या. एवढेच नाही तर लोकांनी त्याला भरघोस प्रतिसादही दिला आहे.
विरोधकांचा खोटेपणा फार काळ टिकणार नाही
विरोधकांच्या फेक नॅरेटीव्हवर खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटले की, "आम्ही काय साध्य केले ते आम्ही जनतेला सांगत आहोत. लोकसभा निवडणुकीदरम्यान, संविधान धोक्यात आहे आणि संरक्षण काढून घेतले जाईल, असा दावा करत फेक नॅरेटीव्ह पसरवले गेले. मला विश्वास आहे की अशा फेक नॅरेटीव्हचे आयुष्य खूपच कमी आहे. खोटेपणा फार काळ टिकत नाही,"
हरियाणात जे झाले तेच महाराष्ट्रात होणार
हरियाणात पोलचे अंदाज चुकले, आता महाराष्ट्रातही असेच फेक नॅरेटीव्ह आणि पोल येतील पण महायुतीचे कामच एवढे जबरदस्त आहे की, पोलही यंदा खरा अंदाज लावू शकणार नाही. हरियाणात अपवाद वगळता सपशेल पोलचे अंदाच फेल ठरले. त्यातच तिथेही एनडीएसारख्या पक्षालाच पसंती दिली गेली आता महाराष्ट्रातही एनडीए आणि त्यांचा घटक पक्ष शिवसेनेलाच पसंती मिळणार आहे. यासंदर्भात श्रीकांत शिंदे यांनाही विश्वास आहे. " हरियाणात फेक नॅरेटीव्हचे उदाहरण पाहिले,तिथे विरोधकांनी फेक नॅरेटीव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला. पण आज महाराष्ट्रात आम्ही विकासाच्या राजकारणावर लक्ष केंद्रित करत आहोत" असे ते म्हणाले.
गेल्या अडीच वर्षात आम्ही ज्या पद्धतीने काम केले, त्यात आम्ही केवळ विकासाचे राजकारण लोकांसमोर मांडत आहोत. आम्ही काय साध्य केले ते दाखवत आहोत. महाराष्ट्रात, विकास, आम्ही पायाभूत सुविधांमध्ये प्रथम क्रमांकावर आहोत, स्टार्टअपमध्ये प्रथम क्रमांकावर आहोत आणि थेट विदेशी गुंतवणुकीत नंबर वन आहोत," शिंदे यांनी जोर दिला.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात कामे रखडली
महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोस्टल रोड आणि झोपडपट्टी विकास आणि घरांच्या समस्या सोडवणाऱ्या उपक्रमांसह महत्त्वाचे पायाभूत प्रकल्प रखडले आहेत, असा आरोपही शिवसेना नेत्याने केला. महायुतीच्या काळात लक्षणीय कामगिरी झाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. या विकासात्मक उपक्रमांचे रूपांतर आगामी निवडणुकीत मतांमध्ये होईल, असा विश्वास शिंदे यांनी एका मुलाखतीत व्यक्त केला आहे.
दहा वर्षात मुंबईत एकही दहशतवादी हल्ला नाही
महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल विरोधक ओरड करतात पण हेच विरोधक जेव्हा जेव्हा सत्तेत होते त्याकाळात मुंबईत बॉम्बस्फोट आणि दहशतवादी हल्ले होत असत. पण महायुती सरकार आल्यानंतर गेल्या आठ दहा वर्षात मुंबई किंवा महाराष्ट्रात एकही दहशतवादी हल्ला झालेली नाही. विरोधक महायुतीत मतभेद असल्याचे फेक नॅरेटीव्ह पसरवत आहेत पण महायुतीत कोणतेही मतभेद नाही, असेही श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले.












Click it and Unblock the Notifications