राज्यात पुन्हा गुलाबी थंडीची लाट, जाणून घ्या, कोणत्या भागात पडणार पाऊस अन् कुठे सर्वाधिक तापणार

Maharashtra Weather Update : बंगालच्या उपसागरात फेंगल चक्रीवादळाने कहर घातला होता. त्यामुळे दक्षिणेतील राज्यांना पावसाचा फटका बसला. फेंगल चक्रीवादाळाचा महाराष्ट्रातील वातावरणावरही परिणाम झाल्याचे दिसून आले. महाराष्ट्रातही गेल्या चार दिवसांपासून पावसाला पोषक वातावरण तयार झाले होते.

एकीकडे हिवाळा असताना दुसरीकडे महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली होती. सर्वत्र ढगाळ वातावरण होते. तापमानही वाढले होते. पण आता कमी दाबाचा पट्टा सैल झाला असून राज्यात पुन्हा गुलाबी थंडीला सुरुवात होणार आहे. येत्या दोन दिवसात काही भागात हलक्या सरींची शक्यता असली तरी उर्वरित भागात हवामान कोरडे होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता राज्यात गारठा वाढणार असल्याचा अंदाज आयएमडी विभागाने वर्तविला आहे.

Maharashtra Weather Update

फेंगल चक्रीवादळानंतर तब्बल आठ दिवसांनी पुन्हा वातावरणात बदल होऊन थंडीची चाहूल लागली आहे. थंडीच्या पुनरागमन झाल्यामुळे बागायतदार शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. फेंगल चक्रीवादळाच्या इफेक्टनंतर आज 7 डिसेंबर रोजी किमान तापमानात गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत घट झाल्याची दिसून आले.

नंदूरबारमध्ये आज निचांकी तापमानाची नोंद झाली असून 15.7 अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. उर्वरित भागात 17 ते 23 अंशांपर्यंत तापमानाची नोंद झाली. दरम्यान, काही भागात ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाची शक्यता असल्यानं शेतकऱ्यांच्या डोक्यावर अवकाळी पावसाचे संकट आहेच.

अवकाळी पावसाने शेतकरी धास्तावले

गोंदिया जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसापासून ढगाळ वातावरण होते. आज सकाळी पासून ढगाळ वातावरण मुळे गोंदिया जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांचे धान पीक कापून ठेवलाय आणि हा कापलेला धान या पावसामुळे खराब होण्याची शक्यता आहेत. तसेच पावसामुळे भाजीपाला, तुळ पीक यांना सुद्धा नुकसान होण्याची संभावना या पावसामुळे व्यक्त करण्यात येत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+