राज्यासाठी पुढील 48 महत्वाचे, परतीच्या पावसाला सुरुवात, या जिल्हांना पावसाचा अलर्ट
मुंबई : राज्यात आता परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यातील अनेक भागात परतीचा पाऊस जोरदार बरसतोय. रविवारपासून परतीच्या पावसाने मुंबई, पुणे, कोकण, मराठावाडा, विदर्भ आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात जोरदार कोसळला आहे. राज्यात पावसानं दमदार हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे.
परतीच्या पावसाने मुंबईसह उपनगर परिसरात सोमवारी रात्रीपासून तुफान पाऊस झाला आहे. आज पहाटेपासूनच ठाणे, कल्याण, पालघर आणि नवी मुंबईत जोरदार पाऊस कोसळला आहे. ठाणे आणि कल्याण शहराला परतीचा पावसाचा जोरदार फटका बसला आहे. अनेक भागात पाणी साचले होते.

राज्यात पुढील 48 तासांसाठी वादळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवण्यात आला. राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. कोकण,मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागातील जिल्ह्यांना पावसाचा यलो लर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे.
23 सप्टेंबर, IMD कडून महाराष्ट्रात पुढील 4,5 दिवस खाली दिलेल्या प्रमाणे मुसळधार पावसाचा इशारा. 24 आणि 25 रोजी अधिक पावसाचे इशारे आहेत कृपया पहा.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 23, 2024
Heavy rainfall alerts by IMD for next 4,5 days in Maharashtra. On 24 and 25 there are higher rainfall alerts to be watched pl. pic.twitter.com/Fc74WXyRvL
कोकणाच्या काही जिल्ह्यात कालही मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे .तसेच आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही आज यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. परभणी, बीड, नांदेड, हिंगोली या चार जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा आज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
परतीच्या पावसाचा महराष्ट्रातील या जिल्हात कहर
परतीच्या पावसाने महाराष्ट्रातील अनेक जिल्हात कहर केला आहे. यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर,धुळे, जळगाव, नंदुबार आणि जळगावमध्ये परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धारशिव, परभणी आणि हिंगोली जिल्हात वादळी वा-यासह पाऊस झाला आहे. तर विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, वाशिम, अमरावती, अकोला, वाशिम जिल्हात पावसाने हजेरी लावली.












Click it and Unblock the Notifications