Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

सावधान! राज्यात पुन्हा उष्णतेची लाट; पुढील पाच दिवस 'असा' दिलाय इशारा, कशामुळे बदललंय वातावरण? वाचा

राज्यात होळीनंतर हवामान चांगलेच बदलले. उष्णता व त्यानंतर अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अनोनात नुकसान केले होते. आता आय़एमडीने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुन्हा उष्णतेची लाट येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तापमानात त्यामुळे चांगलीच वाढ होणार असून, उष्णतेपासून स्वतःचे संरक्षण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Maharashtra temperature

कशामुळे झालाय बदल?

मध्यप्रदेश आणि परिसरात चक्राकार वारे वाहत आहेत. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रापासून उत्तर तामिळनाडूपर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरील बाष्पयुक्त वाऱ्यांचा संगम होत अस्लयाने राज्यातील वातावरण बदलल्याचे सांगण्यात आले आहे.

यंदा उन्हाळा जाणवणार

यंदाच्या उन्हाली हंगामात म्हणजेत एप्रिल ते जून या कालावधीत देशातील बहुतेक भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहणार असल्याच अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील बहुतेक भागात उष्णतेच्या लाटा येण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे उष्णतेपासून स्वतःचे संरक्षण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

तापमान ४० अंशाच्या पुढे

राज्यात अवकाळी पावसाच्या फटकाऱ्यानंतर आता पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटांना सुरुवात होत असल्याचे इशारे हवामान विभागाने दिले आहेत. गेल्या काही दिवसांत राज्यात पावसामुळे तापमानात काहीसा दिलासा मिळाला असला तरी आता प्रचंड उन्हाचा चटका आणि उष्णतेच्या तीव्र झळा बसू लागल्यात. आज राज्यभरातले कमाल तापमान प्रचंड असून विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी 40 अंशांच्या पुढे तापमान गेलंय.

पुढील पाच दिवस पारा चढणार

आज पुण्यात 38 अंश तापमान आज नोंदवलं गेलंय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 39.4 अंश तापमानाची नोंद आहे. बीड, सोलापूर आज 39 अंशांवर आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकणपट्ट्यात प्रचंड तापमानाची नोंद होत असून उष्ण व दमट हवामानाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. यात पालघर ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. पुढील पाच दिवस राज्यात तापमानाचा पारा चढाच राहणार असून काही ठिकाणी हलक्या पावसाचीही शक्यता आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+