IMD alert: महाराष्ट्रात उष्णतेची लाट; तर 'त्या' जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, असे बदलले हवामान
महाराष्ट्रासह देशतभरात तापमानाचा पारा वाढला आहे. वायव्य आणि मध्य भारतातील राज्यांमध्ये हवामान झपाट्याने बदलत आहे. उष्णतेचा परिणाम दिसून येत आहे. येत्या काही दिवसाचा उन्हाचा तडाखा आणखी वाढणार आहे. तर दुसरीकडे भारताच्या पाच जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

महाराष्ट्रात सावधानतेचा इशारा
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील ४ दिवसांत वायव्य आणि मध्य भारतातील कमाल तापमान २-४ अंशांनी वाढू शकते. तर पूर्व आणि पश्चिम भागातील कमाल तापमान ३-५ अंशांनी वाढण्याचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाने रविवारपासून गोवा, कोकण आणि महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटा येईल, असा अंदाज वर्तविला आहे. महाराष्ट्राच्या विदर्भासह मध्य भारतातील तापमान सरासरीपेक्षा किमान २ ते ४ अंश सेल्सिअस जास्त असेल, अशी शक्यता आहे. तर विदर्भात उष्णतेची लाट आल्यानं तापमान तीन ते चार दिवस वाढण्याचा अंदाज आहे.
तापमान ४७ अंशापुढे जाणार
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मे महिन्यात काही दिवस विदर्भातील तापमान ४७ अंशांहून अधिक असेल. या वर्षी फेब्रुवारीमध्ये नोंदवलेले सरासरी तापमान गेल्या १२५ वर्षांपेक्षा अधिक आहे. यामुळे या उन्हाळ्यात तापमान नवा उच्चांक गाठेल, असा अंदाज आहे. या वर्षी मार्च ते मे या कालावधीत तापमान २ ते ४ अंशांनी जास्त असेल, असा हवामान विभागानं अंदाज व्यक्त केला आहे.
तापमान सर्वत्र ३५ अंशाच्या पुढे
८ मार्चला लोहगावमध्ये सर्वाधिक कमाल तापमान ३९.३ अंश सेल्सियसची नोंद झाली आहे. तर कोल्हापूरमध्ये सर्वात कमी ११.५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईत कमाल तापमान ३४ अंश सेल्सियसची नोंद झाली आहे. रत्नागिरी आणि मुंबई वगळता राज्यातील सर्वच जिल्ह्यात तापमानानं ३५ अंश सेल्सियसचा पारा ओलांडला आहे. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
या पाच जिल्ह्यांत पाऊस
9 मार्च रोजी लाहौल-स्पिती, किन्नौर आणि चंबा तसेच कांगडा आणि कुल्लू जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्यम स्वरुपाचा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.महाराष्ट्राबाबत बोलायचं झाल्यास राज्यात आता हळू-हळू उन्हाचा कडाका वाढू लागला आहे, थंडी पूर्णपणे गायब झाली असून, उन्हाचा चटका जाणवू लागला आहे.राज्यात पावसाची कोणतीही शक्यता नसून, वातावरण कोरडं राहण्याची शक्यता आहे.












Click it and Unblock the Notifications