Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

राज्यात 4 ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर वाढणार, या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसापासून अनेक भागात चांगला पाऊस झाला आहे. जुलै महिन्यात पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आता 1 ऑगस्ट ते 4 ऑगस्टपर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. ऑगस्ट महिन्यात राज्यात जोरदार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज आहे.

जुलै महिन्यात राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने कहर केला होता. कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस बरसला होता. तर, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात मात्र समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे मराठवाडा आणि खानदेशात थोडं चिंतेचं वातावरण आहे.

Maharashtra Weather Update

पश्चिम महाराष्ट्रासह कोकण विदर्भातील काही जिल्ह्यांना अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातदेखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पश्चिम बंगाल व लगतच्या दक्षिण बांगलादेशवरच्या CYCIR च्या प्रभावाखाली पुढील 24 तासात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे.पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे 1 ऑगस्ट ते 4 ऑगस्टपर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यातील या जिल्ह्यांना अलर्ट

रेड अलर्टः कोल्हापूर

ऑरेंज अलर्टः पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे

यलो अलर्टः पालघर,मुंबई, नाशिक, ठाणे, जालना, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडझाप सुरूच आहे. जिल्हातील काही भागात पुरग्र्स्त परिस्थिती होती. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली होती. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. जिल्ह्यातील धरणक्षेत्रात अजूनही पाऊस सुरूच आहे. आज 2 ऑगस्टला कोल्हापूर जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्यावतीने देण्यात करण्यात आलं आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+