Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Maharashtra Weather :उत्तर भारतात थंडीची लाट, उत्तर महाराष्ट्रही गारठला, या तारखेपर्यंत राहणार गारठा

Maharashtra Weather : उत्तर भारतात जोरदार थंडीची लाट असून त्यामुळे येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातही जोरदार गारवा जाणवत आहे. महाराष्ट्रातील जळगावसह उत्तर महाराष्ट्रात याचा मोठा प्रभाव दिसून आला आहे. गेल्या आठवड्यात फेंगल चक्रीवादळामुळे उत्तर भारतातून येणारे वारे अडल्याने उष्णता जाणवली होती आणि तापमानही वाढले होते. आता याविपरित परिस्थिती सध्या दिसून आली आहे.

थंडीने आता संपूर्ण उत्तर भारताला व्यापले आहे. डोंगराळ भागापासून ते पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेशसारख्या सपाट राज्यांमध्ये थंडीचा जोर वाढला आहे. काश्मीर खोऱ्यातील तापमान गोठणबिंदूच्या खाली सतत आहे. मंगळवारी गुलमर्गमधील तापमान उणे 9 अंशांवर पोहोचले, तो या मोसमातील सर्वात थंड दिवस होता.

Maharashtra Weather

किमान तापमान 8 अंशावर

दिल्ली आणि उत्तर भारताची स्थिती दिल्ली आणि आसपासच्या भागात थंडी वाढली आहे. किमान तापमान 8 अंशांवर पोहोचले आहे. सकाळ आणि संध्याकाळच्या थंड वाऱ्यांमुळे दिवसा उन्हातही उन्हाचा तडाखा जाणवत नाही. येत्या काही दिवसांत धुके आणि धुक्याचा प्रभाव वाढणार असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे.

उत्तर महाराष्ट्र गारेगार, आठदिवस गारठा

उत्तर महाराष्ट्रात थंडीमुळे गारठा वाढला असून जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यात किमान तापमानाचा पारा खाली घसरला आहे. अंदाजे तीन ते चार अंश सेल्सियसने येथे तापमान घटले असून सरासरी पारा आठ ते नऊ अंशावर पोहचला आहे. आता या थंडीचा आठवडाभर जोर राहणार असून साधारणतः 18 डिसेंबरपर्यंत थंडीचा जोर कायम राहील तर मध्य महाराष्ट्रातही तापमानात घट होत असल्याचे दिसून येत आहे.

धुळ्यात सलग दुसऱ्या दिवशी पारा निचांकी 5.8 अंशांवर

धुळ्यात सलग दुसऱ्या दिवशी निचांकी 5.8 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आजही जिल्ह्यात कड्याच्या थंडीमुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. रात्री पासून थंड वाऱ्यामुळे बोचरी थंडी जाणवत असल्याने अनेक जण शेकोटीचा आसरा घेतांना दिसत आहेत. काल 4 डिग्री तापमान नोंदवले गेले होते. आज थोडी वाढ झाली आहे.

थोडक्यात महत्वाचे

  • दिल्लीचा एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) 211 वर पोहोचला आहे, जे खराब परिस्थिती दर्शवते.
  • श्रीनगरमध्ये किमान तापमान -5.4 अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
  • हिमाचल प्रदेशात थंडीच्या लाटेमुळे 15 ठिकाणी तापमान गोठणबिंदूच्या खाली पोहोचले आहे.
  • बर्फवृष्टीमुळे अनेक रस्ते आणि महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

उत्तर प्रदेशातील थंड वाऱ्यांचा प्रभाव

उत्तर प्रदेशातील थंड वाऱ्यांचा प्रभाव दक्षिणेत जाणवत असून उत्तर भारतातील 8 शहरांमध्ये थंडीची लाट सुरू आहे. 10 शहरांमध्ये दाट धुके आहे. बुलंदशहर हे सर्वात थंड होते, जेथे तापमान 6 अंशांपर्यंत घसरले. थंडीची लाट आणि थंडीचा प्रभाव पुढील तीन दिवस वाढण्याची शक्यता आहे. याचा मोठा परिणाम महाराष्ट्रावरही होत असून जळगावचे तापमान आत आठ अंशावर आले आहे.

थंडीची लाट म्हणजे काय?

थंड वाऱ्यांमुळे किमान तापमान 10 अंशांवरून 4-5 अंशांपर्यंत खाली जाते किंवा 4 अंशांच्या आसपास राहते, तेव्हा त्याला शीतलहरी म्हणतात, असे हवामानतज्ज्ञांचे म्हणणे आहे. ही परिस्थिती आरोग्यासाठी धोकादायक मानली जाते आणि लोकांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.

आरोग्यावर परिणाम

थंडीची लाट असताना, थंडीमुळे शरीर झपाट्याने थंड होऊ शकते, त्यामुळे आजार वाढू शकतात. विशेषतः वृद्ध आणि लहान मुलांनी अधिक सावध राहण्याची गरज आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+