Maharashtra Weather Update : उत्तरेत हिमवृष्टी, गार वाऱ्यांमुळे आगामी 4 दिवस महाराष्ट्रात थंडीची लाट
Maharashtra Weather Update : थंडी एवढी पडतेय की, रात्री आणि पहाटे बाहेर फिरणेही आता जिकरीचे वाटू लागले आहे, प्रचंड थंडीमुळे महाराष्ट्र गारठला असून येत्या चार दिवसांत थंडीची आणखी लाट येणार असल्याचे हवामान विभागाचा अंदाज आहे. तर दुसरीकडे उत्तर भारतात थंडीचा मोठा कडाका सुरु आहे.
महाराष्ट्रात गारठा
राज्यात थंडी दिवसेंदिवस वाढत असून किमान तापमानात चांगलीच घट होत आहे, त्यामुळे थंडीचा कडाका वाढत आहत. उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट तीव्र असू्न किमान तापमानाचा पारा 8 अंशापर्यंत पोहोचला आहे. तर राज्यातील तुरळक ठिकाणी किमान तापमानात किंचित वाढ झाली असली तरी थंडीची लाट कायम आहे.

परभणी तापमान 4.6 वर
परभणी जिल्ह्यात मागील आठवड्यापासून थंडीचा जोर वाढत असून आज सर्वाधिक नीचांकी तापमान 4.6 डिग्री सेल्सिअस राहीला आहे, ही नोंद वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या हवामान विभागाने नोंदवली आहे. उत्तर भागात होणारी हिमवृष्टी आणि उत्तरे कडून येणार थंड वारे तसेच आपल्या भागात असलेले कोरडे वातावरण यामुळे पारा खाली जात असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
हेही वाचा : महाराष्ट्रात आज कुठे पडणार पाऊस? थंडी गायब का झाली? जाणून घ्या हवामानाची बित्तंमबातमी एका क्लिकवर!
उत्तर महाराष्ट्र, विदर्भात तापमानात घट
दरम्यान या आठवड्यात उत्तर महाराष्ट्रानंतर आता विदर्भातील काही ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घट झाली आहे. तापमानात घट म्हणजेच या भागातील लोकांना आता आणखीनच गारठ्याचा सामना करावा लागत आहे. येत्या चार दिवसात यात अजून वाढ होणार असून थंडीचा जोर वाढणार असा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे.
हेही वाचा : Maharashtra Weather Update : राज्यात कसे असणार वातावरण कुठे असेल सर्वाधिक थंडी, वाचा सविस्तर
नऊ ते दहा अंशाच्या खाली आला पारा
उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील किमान तापमान 9 ते 10 अंशांवर खाली आले होते. थंडीची लाट राज्यात सक्रिय झाली असून 18 डिसेंबरपर्यंत ही लाट अधिक तीव्र होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
आता धुक्याशी सामना
थंडीची लाट ज्या प्रकारे वाढत आहे त्याचे कारण गेल्या काही दिवसांपासून तापमानात घट झाली आहे. थंडीच्या लाटेमुळे थंडीचा कडाका वाढला आहे. दिल्ली आणि परिसरात थंडीच्या लाटेचा प्रभाव स्पष्टपणे दिसत आहे. येत्या काही दिवसांत लोकांना धुक्याचा सामना करावा लागणार असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे.
आजच्या हवामानाविषयी बोलायचे झाले तर, पर्वतांवर जोरदार बर्फवृष्टी होत आहे, त्यामुळे दिल्ली आणि परिसरात थंडी वाढली आहे. तापमान ४ अंश सेल्सिअसवर पोहोचले असून येत्या काही दिवसांत तापमान आणखी खाली जाण्याची शक्यता आहे.
राजस्थानची स्थिती"पाहता येथेही कडाक्याची थंडी कायम आहे. फतेहपूरमध्ये किमान पारा शून्यावर पोहोचला आहे. हवामान विभागाचे म्हणणे आहे की सीकरच्या फतेहपूरमध्ये तापमान सर्वात कमी होते जेथे पारा 1.3 अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. तर चुरूमध्ये पारा 2.4 अंश, भिलवाडामध्ये 2.6 अंश आणि सिरोहीमध्ये 3.0 अंशांवर पोहोचला. काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी झाल्यामुळे पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. येत्या काही दिवसांत तापमान आणखी खाली जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.












Click it and Unblock the Notifications