महाराष्ट्रात आज कुठे पडणार पाऊस? थंडी गायब का झाली? जाणून घ्या हवामानाची बित्तंमबातमी एका क्लिकवर!
Maharashtra Weather : महाराष्ट्रात पावसाची शक्यता काही जिल्ह्यात असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे, त्यानुसार अंदाज आणि अलर्टही देण्यात आला आहे. यासह सध्या असलेल्या ढगाळ वातावरणामुळे अजून काही दिवस हवेत दमटपणा राहू शकतो.अशा स्थितीत महाराष्ट्रात कुठे पाऊस पडणार हे जाणून घेऊया.
आज 5 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्रात कोकणातील रत्नागिरी, सिंधूदुर्ग जिल्ह्यांना वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला.

महाराष्ट्रात पावसाचा कुठे कसा अंदाज?
- रायगड जिल्ह्यातही हलक्या ते मध्यम पावसाचा हवामान विभागाचा अंदाज
- मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढू शकतो, नगर जिल्ह्यात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडू शकतो.
- पुणे व सातारा घाट परिसरात मुसळधार पाऊस राहू शकतो.
- मध्य महाराष्ट्रात आज पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट
- मराठवाड्यात धाराशिव आणि लातूर या दोन जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट
- बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता
थंडी गायब...पण का झाली?
उत्तर भारतातून संपूर्ण नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात थंडी घेऊन येणारे थंड व कोरड्या उत्तरी वाऱ्यांना, बंगालच्या उपसागरातून फेंजल चक्रीवादळाच्या वाऱ्यांना पूर्वे दिशेकडून लोटलेल्या आर्द्रतायुक्त वाऱ्यामुळे अटकाव केला, यामुळे थंडी कमी झाली आहे तर फेंगलमुळेच ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने दमटपणा अजून वाढू शकतो.
गेल्या 24 तासांत पाऊस आणि तापमान
- गोव्यासह महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी गेल्या चोवीस तासात पाऊस झाला. मध्य महाराष्ट्र,
- मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. कोकण गोव्यातील काही ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे.
गेल्या 24 तासांत राज्यातील प्रमुख शहरांतील किमान तापमान (अंश सेल्सियसमध्ये)
- मुंबई (कुलाबा) 25.8
- सांताक्रूझ 25.5.
- अलिबाग 23.4
- रत्नागिरी 26.6
- पणजी 28
- डहाणू 23.4
- पुणे 22.5
- लोहगाव 22.9
- अहमदनगर 29.7
- आळगाव 14.8
- कोल्हापूर 22.6
- महाबळेश्वर 17.6
- मालेगाव 20.8. नाशिक 21.9
- सांगली 23
- सातारा 22.7
- सोलापूर 22.4
- धाराशीव 21
- छत्रपती संभाजीनगर 21.4
- परभणी 22.1
- बीड -23
- अकोला -23.0
- अमरावती 20.9
- बुलढाणा 20.8
- ब्रह्मपुरी 19.5
- चंद्रपूर 15.4
- नागपूर 20.2
- वाशीम 21.6
- वर्धा 21.6
5 ते 10 डिसेंबरदरम्यान हवामानाचा अंदाज
5 डिसेंबर :आकाश सामान्यतः ढगाळ राहून अति हलक्या ते हलक्या पाऊस पडण्याची शक्यता. सकाळी विरळ धुके पडण्याची शक्यता.
6 डिसेंबर :आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता. सकाळी धुके पडण्याची शक्यता.
7 डिसेंबर :आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता. सकाळी धुके पडण्याची शक्यता.
8 डिसेंबर :आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता. सकाळी धुके पडण्याची शक्यता.
9 डिसेंबर :आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता. सकाळी धुके पडण्याची शक्यता.
10 डिसेंबर :आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता. सकाळी धुके पडण्याची शक्यता.












Click it and Unblock the Notifications