Maharashtra Weather Update : राज्यातील 'या' जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट, नागरिकांनो काळजी घ्या

Maharashtra Weather Update : मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात मागील दोन दिवसांपुर्वी अतिवृष्टी झाल्यानंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. मात्र आता परत मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये विजाच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये पुणे आणि संपूर्ण कोकणाला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरात सक्रिय असणाऱ्या वाऱ्यांचं कमी दाबाच्या पट्ट्यामध्ये रुपांतर झाल्यामुळे कोकणासह घाटमाथ्यावरील क्षेत्रात पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे. कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ते खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे.

Maharashtra Weather Update

पश्चिम महाराष्ट्रातील सातारा,पुणे आणि कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडमध्ये मुसळधार पावसामुळे काही भागांमध्ये पाऊस अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरच्या परिसरात काही ठिकाणी ढगाळ वातावरण आणि अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या सरींची हजेरी पाहायला मिळतील. पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आकाश अंशत: ढगाळ राहील आणि शहरासह उपनगरात अधूनमधून मध्यम ते तीव्र पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 31 आणि 26 अंशांच्या घरात राहील.

हवामान विभागाच्या माहीतीनुसार आज मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्याता आहे. यामध्ये छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, लातूर, धाराशीव आणि परभणी जिल्ह्याचा समावेश असणार आहे. तर विदर्भातील नागपूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान मागील दोन दिवसांपुर्वी मराठवाडा आणि विदर्भातील शेतक-यांचे मुसळधार पावसाने शेतक-याचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. हातातोडांशी आलेली पीकाचं मोठं नुकसान झाल्यामुळे शेतक-यांना अश्रू अनावर झाले. सरकारने पंचनामे करुन तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+