maharashtra weather update: शेतक-यांनो काळजी घ्या, राज्यातील 'या' जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट
मुंबई : मागील चार पाच दिवसापासून परतीच्या पावसाने राज्यातील काही जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. पावसाची उघडझाप झालेल्या भागात उकाडा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर पुढील तीन दिवस पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने राज्यातील काही जिल्हांसाठी पावसाचा अलर्ट दिला आहे.
मुंबई, ठाणे, पालघर रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर , बीड, धारशिव, लातूर, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्याला पावसचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. धुळे नाशिक, नंदुरबार, अहिल्या नगर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात या जिल्ह्यांत आज आणि उद्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील अकोला, वाशिम, बुलडाणा , वर्धा आणि यवतमाळ जिल्हातही पाऊस पडण्याची शक्यता आहे.

बुलढाणा आणि जळगाव जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. या परतीच्या पावसामुळे काढणीसा आलेल्या पिकांना मोठा फटका बसला आहे. शेतक-यांच्या हातातोंडाशी आलेल्या घास परतीच्या पावसामूळे मोठं नुकसान होतं आहे. मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवण्यात आला आहे.
18 Oct, Cycir over EC Arabian Sea:
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 18, 2024
✔️A low pressure area likely to form over east central Arabian sea during next 12hrs.
✔️Likely to become more marked & move WNWwards away frm Indian coasts during Subseq 3 days.
Pl watch IMD updates.
Mod-dense clouds ovr Konkan & adj region. pic.twitter.com/8VyIHBid1g
दरम्यान वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यात कागी ठिकाणी काल अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या परतीच्या पावसामुळे सोयाबीन आणि कापसाचे मोठे नुकसान झालं आहे. परतीच्या पावसामूळे जमीनीत ओलावा असल्याने रब्बीच्या पिकाची पेरणी करण्या-या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे.












Click it and Unblock the Notifications