नागपूर, अमरावती, भंडारा, गडचिरोलीत पावसामुळे हाहाकार!देवेंद्र फडणवीसांनी 'हे' दिले आदेश
नागपूर - नागपूर शहर, आणि जिल्ह्यासह अमरावती, भंडारा येथे पावसामुळे हाहाकार उडाला असून जनजीवनही विस्कळीत झाले आहे. अनेक गाव, शेत आणि घरांत पाणी शिरले असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.
गोंदीयात दमदार हजेरी
गोंदिया जिल्यात काल रात्रीपासून पावसाने सर्वच तालुक्यात दमदार हजेरी लावली आहे तर मुख्यतः देवरी आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली याचा फटका जिल्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या अतिदुर्गम अर्जुनी-मोरगाव तालुक्याला बसला.

अमरावती जिल्ह्यात अलर्ट
अमरावती जिल्ह्यात मागील 48 तासापासून रिमझिम पाऊस सुरू आहे. सतधार पावसामुळे शेतीचे काम थांबले असून अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली आहे. विविध तालुक्यातील स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या मेळघाटातील लहान-मोठे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत त्यामुळे काही गावांमध्ये संपर्क तुटला. अनेक ठिकाणी किरकोळ स्वरूपात दरळ व झाडे उन्मळून पडल्याने चित्र आहे.

या गावांत, शहरात पाऊस
यासोबतच अचलपूर चांदूरबाजार या भागात अनेक गावांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. तर काही गावांमध्ये जीर्ण झालेल्या घराच्या भिंती कोसळल्या आहेत. अंजनगाव दर्यापूर तालुक्यांमध्ये असलेल्या केळी पिकाचे यामुळे काही प्रमाणात नुकसान झाले आहेत. आतापर्यंतचे गर्मी व अचानक आलेल्या पावसाने निर्माण झालेल्या वातावरणामुळे केळी झाडावरच पीक असल्याची माहिती शेतकरी देत आहेत.
तिवसा धामणगाव रेल्वे चांदुर रेल्वे या भागामध्ये सुद्धा समाधानकारक पाऊस झाला असून काही ठिकाणी किरकोळ नुकसान झाले आहे. अमरावती बडनेरा शहर काही भागात पावसाचे पाणी शिरले असून काही प्रतिष्ठानांचे नुकसान झाले आहे. अमरावती शहरातील खापर्डे बगीचा परिसरात अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अलर्ट दिला असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन चमू सुद्धा सक्रिय झाले आहेत.
नागपूर शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. मी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्कात असून स्वतः जिल्हाधिकारी शहराचा दौरा करीत आहेत. शाळांना सुटी देण्यात आली असून ज्या सखल भागात पाणी शिरले तेथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी…
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 20, 2024
नागपूर शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. मी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्कात असून स्वतः जिल्हाधिकारी शहराचा दौरा करीत आहेत. शाळांना सुटी देण्यात आली असून ज्या सखल भागात पाणी शिरले तेथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी…
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 20, 2024भंडाऱ्यात रेड अलर्ट
भंडारा जिल्ह्याला हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला असुन रात्री पासुन जिल्ह्यात संततधार पावसाने झोडपून काढलं आहे. अनेक सखल भागात पावसाचे पाणी साचले आहे. तर भंडारा शहरातील रुख्मिणी नगर येथे पावसाचं पाणी अनेकांच्या घरात शिरला आहे. तर रस्त्यावरून गुडघाभर पाणी साचलं आहे. दर पावसाळ्यात रुख्मिणी नगर येथे पाणी साचात असला तरी प्रशासनाच्या वतीने पावसाळ्या आधी उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात पूर 8 मार्ग बंद
गडचिरोलीत रात्रीपासून जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडल्याने अनेक नद्या आणि नाल्यांना पूर आला असून, ८ मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. भामरागडनजीकच्या पर्लकोटा नदीला पूर आला आहे.मागील चोवीस तासांत देसाईगंज तालुक्यात सर्वाधिक 137 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल कुरखेडा तालुक्यात ११६.६ मिलिमीटर पाऊस पडला.
भामरागडनजीकच्या पर्लकोटा नदीच्या पुलावरुन पाणी वाहू लागल्याने तेथे बॅरिकेट लावून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पुरामुळे आलापल्ली-भामरागड, भामरागड-एटापल्ली अहेरी-मोयाबीनपेठा, कुरखेडा-चारभट्टी, आलापल्ली-सिरोंचा, जारावंडी ते पाखांजूर, पोर्ला-वडधा, वैरागड-शंकरपूर या आठ मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
नागपूर शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. मी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्कात असून स्वतः जिल्हाधिकारी शहराचा दौरा करीत आहेत. शाळांना सुटी देण्यात आली असून ज्या सखल भागात पाणी शिरले तेथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. कुही परिसरात काही रस्ते बंद झाले आहेत. नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासनाने सतर्क राहावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
यंत्रणांना आदेश
नागपूर विभागात सुद्धा गडचिरोलीतील काही भागांचा संपर्क तुटला आहे. विभागीय आयुक्त सातत्याने सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्कात आहेत. त्यांनाही सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्यास सांगण्यात आले आहे.












Click it and Unblock the Notifications