Maharashtra SSC Result 2025 : दहावीच्या निकालाची 10 वैशिष्ट्य जाणून घ्या, यंदा काय आहे खास? वाचा
Maharashtra SSC Result 2025 : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल आज जाहीर झाला आहे. या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे.
महाराष्ट्रात दहावीचा निकाल लागल्यानंतर या निकालाची खास काही वैशिष्ट्य आहेत, आज आपण दहावीच्या निकालाची १० वैशिष्ट्य जाणून घेणार आहोत.

१. यंदाही मुलींचीच बाजी
महाराष्ट्रातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल यंदा ९४.१० टक्के लागला आहे. उत्तीर्ण होण्यात मुलींची टक्केवारी ९६.१४ टक्के आहे तर मुलीची टक्केवारी ९२.३१ टक्के आहे. म्हणजेच मुलांपेक्षा मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ३.८३ टक्के आहे.
२. ७, ९२४ शाळांचा निकाल शंभर टक्के
यंदा महाराष्ट्रातून जवळपास ७, ९२४ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. त्यामुळे निकाल यंदा चांगला लागला हे स्पष्ट होते. मात्र गेल्यावर्षीपेक्षा निकाल कमीच आहे.
३. ८६ हजार ६४१ विद्यार्थी नापास
राज्यातील २३ हजार ४८९ माध्यमिक शाळांमधील १५ लाख ५८ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यंदा जवळपास ८६ हजार ६४१ विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकले नाही.
४.गतवर्षीपेक्षा यंदा पास झालेल्यांचा टक्का घटला
यंदा राज्यात दहावीच्या परिक्षेत पास झालेल्यांची टक्केवारी ९४.१० टक्के इतकी आहे. गेल्यावर्षी ती ९५.८१ टक्के इतकी होती. एकाअर्थाने १.७१ टक्क्यांनी उत्तीर्णांचा टक्का घसरला आहे.
५. द्वितीय श्रेणीत ३ लाख ६० हजार ६३० विद्यार्थी उत्तीर्ण
राज्यात द्वितीय श्रेणीत म्हणजेच ४५ टक्के किंवा ४५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण मोठे आहे. अर्थातच द्वितीय श्रेणीत ३ लाख ६० हजार ६३० विद्यार्थी उत्तीर्ण पास झाले आहेत.
६. प्रथम श्रेणीत ४ लाख ९७ हजार २७७ विद्यार्थी उत्तीर्ण
राज्यात एकूण विद्यार्थ्यांमध्ये ४ लाख ९७ हजार २७७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. म्हणजेच ६० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण विद्यार्थ्यांनी मिळवले आहेत.
७. २११ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण
राज्यातील जवळपास २११ मुलांना शंभर टक्के गुण प्राप्त झाले आहेत.
८. २४ विषयांचा निकाल शंभर टक्के
दहावीची ६२ विषयांची परीक्षा २४ विषयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. त्यात २११ मुलांनीही शंभर टक्के गुण मिळवले आहेत.
९. सर्वात जास्त निकाल सिंधुदूर्ग जिल्ह्याचा
महाराष्ट्रात दहावीच्या परिक्षेत सर्वात जास्त निकाल सिंधुदुर्ग जिल्ह्याचा लागला आहे. या जिल्ह्यात ९९.३२ टक्के निकाल लागला.
१०. सर्वात जास्त निकाल कोकण मंडळाचा
राज्यात सर्वात जास्त निकाल कोकण मंडळाचा लागला आहे. कोकण मंडळाचा ९९.८२ टक्के निकाल लागला तर सर्वात कमी नागपूर विभागाचा निकाल लागला आहे. नागपूर मंडळाचा ९०.७८ टक्के निकाल लागला आहे.












Click it and Unblock the Notifications