Maharashtra rain : पाऊस परतणार! या जिल्ह्यांत आजपासून विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा अन् सरी बरसणार
Maharashtra rain : महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्याच्या विविध भागांत तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. यावेळी पावसाचा जोर कमी असला तरी, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.

गेल्या दहा-बारा दिवसांपासून राज्याला झोडपून काढणाऱ्या पावसाने काहीशी विश्रांती घेतल्यानंतर आता पुन्हा पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. गणपती प्रतिष्ठापनेपर्यंत हे पावसाचे वातावरण कायम राहू शकते. बदलत्या हवामानानुसार हवामान विभागाकडून पुढील अपडेट्स दिले जातील.
Light to moderate rain/thundershowers very likely to occur at a few places in the districts of Madhya Maharashtra and at isolated places in the districts of Marathwada.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) August 23, 2025
Moderate rainfall verly likely to occur at most places in the districts of North Konkan.
विभागांनुसार पावसाचा अंदाज आणि अलर्ट
कोकण, गोवा आणि विदर्भ
कोकण आणि गोवा: पुढील ४ ते ५ दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भ: पुढील २ ते ३ दिवस बऱ्याच ठिकाणी पाऊस येण्याची शक्यता आहे.
रायगड: पुढील ४ ते ५ दिवस तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मराठवाडा
मराठवाडा: पुढील ३ ते ४ दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
परभणी, हिंगोली आणि लातूर: पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून, या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
संपूर्ण विदर्भ
विदर्भातील सर्व जिल्हे: २५ ते २७ तारखेला तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस येण्याची शक्यता असल्याने, या कालावधीसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पुणे, कोल्हापूर आणि सातारा: पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोसाट्याचा वाराही वाहू शकतो.
घाट विभाग: या जिल्ह्यांच्या घाट विभागात पुढील दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुणे शहर आणि परिसर
पुढील चार दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहील आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल. घाट विभागात जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने पुढील चार ते पाच दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुढील काही दिवस हवामान बदलाकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे, विशेषतः यलो अलर्ट जारी केलेल्या जिल्ह्यांमध्ये नागरिकांनी काळजी घ्यावी आणि गरजेप्रसंगी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात असे हवामान विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा : महाराष्ट्रात का पडतोय मुसळधार पाऊस? 'या' कारणांमुळे वाढला पावसाचा जोर.. आता कधी ओसरणार? वाचा सविस्तर












Click it and Unblock the Notifications