सिद्धेश कदम यांच्यामुळे प्रदूषण मंडळाची अभूतपूर्व वाटचाल; पर्यावरण संवर्धनासाठी मोठे पाऊल!
Siddhesh Kadam : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची धुरा सिद्धेश कदम यांनी जेव्हापासून हाती घेतली, तेव्हापासून हा विभाग अतिशय वेगाने काम करू लागला आहे. या विभागाच्या माध्यमातून राज्यभरात विविध उपक्रम राबविले जात आहेत. महाराष्ट्र प्रदूषणमुक्त करण्यासाठी सिद्धेश कदम यांचा पुढाकार व त्यांचा दृष्टीकोन अतिशय उल्लेखनिय व मार्गदर्शक ठरू लागला आहे.
महाराष्ट्रातील प्रदूषण नियंत्रणात आणणे, राज्यातील बड्या शहरातील प्रदूषण संदर्भात येणाऱ्या समस्या सोडविणे, यासह सातत्याने नवनवीन उपक्रम राबविण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ मोठ्या हिरीरीने काम करत आहे. यात उल्लेखनिय बाब म्हणजे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांची अधिकाऱ्यांना होत असलेली मदत व त्यांचे मार्गदर्शन अतिशय महत्त्वपूर्ण ठरत आहे. राजकारणातील यंग स्पिरीट, डॅशिंग व्यक्तिमत्त्व म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिले जाते.
राज्यातील वाढते प्रदूषण नियंत्रणात राहावे, यासाठी सिद्धेश कदम हे सातत्याने बैठका घेऊन अधिकाऱ्यांना सूचना देत आहेत. तर नागरिकांनी देखील काय जबाबदारी घेतली पाहिजे, याची जाणीव देखील ते वारंवार त्यांच्या भाषणातून देत आहेत. राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये प्रवास दौरा करून ते विविध प्रकल्पांची पाहणी करतात. तसेच अधिकाऱ्यांना सूचना देऊन कामाला गती देत आहेत. आज आपण महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या माध्यमातून राज्यभरात नेमकं कसं काम चालू आहे, यावर नजर टाकणार आहोत.

महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या सूचना
प्रदूषण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम हे विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन तेथील स्थानिक स्वराज्य प्रशासनाची संवाद साधत आहेत. नुकत्याच त्यांनी पुणे जिल्ह्यात दौरा केला. यावेळी त्यांनी मनपा आयुक्तांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. सिद्धेश कदम यांनी सांगितले, की महापालिकेच्यावतीने मैलापाण्यावर प्रक्रिया करणार्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत. परंतु, यानंतरही जे मैलापाणी थेट नदीमध्ये जाते, ते नदीत सोडण्यापूर्वी ओढे, नाल्यांच्या भागातच त्यावर प्रक्रिया करण्यासंदर्भात एमपीसीबी कडून उपाययोजना केल्या जाव्यात, असा सूचना केल्या.

पाणी तपासणीसाठी सर्वेक्षण करण्याच्या सूचना
एसटीपी प्लांट तसेच कचरा प्रक्रिया प्रकल्पांसाठीच्या जागा मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी सिद्धेश कदम हे पुढाकार घेत आहेत. शहराला पाणी पुरवठा करणार्या धरण क्षेत्रांच्या परिसरात मोठ्याप्रमाणावर हॉटेल्स, फार्म हाउस तसेच व्यावसायीक आस्थापना तयार झाल्या आहेत. तेथे निर्माण होणारे मैलापाणी धरणांच्या पाण्यात मिसळते का याची तपासणी करण्यासाठी सर्वेक्षण करण्याच्या पीएमआरडीएला त्यांनी सूचना देखील केलेल्या आहेत.

धुळीचे प्रमाण रोखण्यासाठी उपाययोजना!
सिद्धेश कदम यांनी सांगितले की, शहरात मोठ्या प्रमाणावर विकास कामे सुरू आहेत. धुळीचे प्रमाण भरपूर वाढते, त्यामध्ये आरएमसी प्लँटमुळे देखील भर पडते. ती टाळण्यासाठी एमएमआरडीएच्या धर्तीवर काही उपाययोजना महापालिकेला सुचविण्यात आलेल्या आहेत. ज्यामुळे हवेतील प्रदूषण रोखण्यात मोठा लाभ होणार आहे, अशाही सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

अंत्यसंस्कारासाठी जळाऊ लाकडाला पर्याय देणार!
सिद्धेश कदम यांनी अतिसंवेदनशील विषयाला देखील हात घातला आहे. पर्यावरणाचा समतोल राखायचा असेल तर वृक्षतोड थांबवणे गरजेचे आहे. विशेष करून स्मशानभूमीमध्ये दहनाचा विषय संवेदनशील आणि किचकट असतो. सर्व बाजूंनी योग्य बॅलन्स राखून जळाऊ लाकडाला पर्याय देण्याचा त्यांनी विचार मांडला आहे. येत्या काळात विद्युत, गॅस दाहिनी सारख्या पर्यांयांना प्राथमिकता देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील, यासाठी सिद्धेश कदम हे पुढाकार घेत आहेत.
प्लॅस्टिक वापरावर बंदीसंदर्भात पाऊल!
सिद्धेश कदम यांनी सिंगल युज्ड प्लास्टिक वापराबाबत आकारण्यात येणार्या दंडाची रक्कमेवरुन ही नुकतेच भाष्य केले. महापालिका प्रशासनाने त्यांच्या अधिकारात महापालिका अधिनियमानुसार दंडाची रक्कम कमी करता येईल का हे तपासून पहावे, जेणेकरून लोकांना त्रास होणार नाही, अशीही भूमिका त्यांनी मांडली. तर पर्यावरण संरक्षणासाठी लोकांनी देखील पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

शिवाजी पार्कवरील धुळीसंदर्भात उचलले पाऊल
शिवाजी पार्क मैदानावरील धुळीची समस्या आवश्यक त्या सर्व उपाययोजना करून मार्गी लावावी, असे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी मुंबई महापालिका प्रशासनाला दिले आहेत. त्यासाठी त्यांनी पाऊले उचलली आहेत. मुंबई महापालिकेच्या वतीने या ठिकाणी सातत्याने उपाययोजना केल्या जात आहेत. त्यासाठी सिद्धेश कदम यांनी पुढाकार घेतला.
सिद्धेश कदमांचा कामाचा धडाका!
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम हे सातत्याने विविध शहरात भेटी देऊन प्रदूषण नियंत्रणासाठी पुढाकार घेत आहेत. नुकताच त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या मालाड, वर्सोवा, बांद्रा आणि धारावी येथील सांडपाणी जलशुद्धीकरण यंत्रणेची पाहाणी केली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि आयआयटीएम यांच्या सतत हवा गुणवत्ता निरीक्षण केंद्रांना ही भेटी दिल्या.
यावेळी हवेची गुणवत्ता कशी तपासली जाते याबाबत तांत्रिक माहिती जाणून घेतली. काही दिवसांपूर्वी येथील हवा गुणवत्ता कोणत्या कारणामुळे खालावली होती याबाबत देखील माहिती सिद्धेश कदम यांनी उपस्थित अधिकाऱ्यांकडून सविस्तरपणे जाणून घेतले आणि त्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

काटदरे यांच्या कासव संवर्धनाचा गौरव!
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व महाराष्ट्र टाइम्स यांच्या वतीने दिला जाणारा "वसुंधरा साथी पुरस्कार" कोकणातील पर्यावरण प्रेमी आणि कासव संवर्धनासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे भाऊ काटदरे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदूषण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम व मटाचे संपादक पराग करंदीकर यांची उपस्थिती होती. पर्यावरण संवर्धनासाठी आयुष्य वेचणारे काटदरे यांचा सन्मान करण्याची संधी मिळते, हा मोठा आनंदाचा क्षण आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

नागपुरात पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना
काही दिवसांपूर्वीच सिद्धेश कदम यांनी नागपूर येथे वेस्टर्न कोल फील्ड लिमिटेड आणि महाजेनकोच्या अधिकाऱ्यांसोबत कोळसा निर्मिती, त्याचे वहन आणि वापरामुळे होणारे हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत बैठक घेतली. या बैठकीत सध्या राबवत असलेल्या व भविष्यात राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची अधिकाऱ्यांनी माहिती दिली. यावेळी संबंधित उपाययोजनांचा सविस्तर आराखडा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात सादर करण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले, आहेत.












Click it and Unblock the Notifications