ठाकरेंना धक्का, एकनाथ शिंदेंची मोठी कोंडी; भाजपने नेमका काय डाव खेळला?
भारतीय जनता पक्षाकडून सध्या एकनाथ शिंदे यांची कोंडी करण्याचा जोरदार प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. याचे उदाहरण आपण पाहिले तर अशा अनेक पदाधिकारी आणि नेत्यांच्या प्रवेश गेल्या काही काळात भाजपमध्ये झालेला आहे ज्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेविरोधात निवडणूक लढवली आहे अथवा ते स्थानिक पातळीवर शिंदेंच्या नेत्यांचे कट्टर विरोधक आहेत.

उदाहरणार्थ पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात संग्राम थोपटे यांचा एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार विजय शिवतारे यांनी पराभव केला होता. मात्र निवडणूक झाल्यानंतरच्या काही महिन्यातच संग्राम थोपटे यांना भाजपमध्ये सामावून घेण्यात आलं. दुसरीकडे आज मंगळवारी मुंबईत एक महत्त्वाचा प्रवेश सोहळा पार पडला. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराला तगडे आव्हान देणाऱ्या वैशाली सूर्यवंशी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
वैशाली सूर्यवंशी यांनी ठाकरे गटाकडून निवडणूक लढवत एकनाथ शिंदे यांचे उमेदवार किशोर पाटील यांना कडवे आव्हान दिले होते. वैशाली सूर्यवंशी या किशोर पाटील यांच्या सख्ख्या चुलत बहिण आहेत. भावा-बहिणीची ही लढत राज्यभरात चर्चेचा विषय ठरली होती. किशोर पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर वैशाली सूर्यवंशी यांनी ठाकरेंसोबत जाऊन किशोर पाटलांसमोर मोठं आव्हान उभं केलं होतं. पाचोरा-भडगाव मतदारसंघातील प्रमुख महिला नेत्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सूर्यवंशी यांनी मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत अधिकृत प्रवेश केला.
वैशाली सूर्यवंशी यांनी भाजपात प्रवेश करण्यामागे काही राजकीय आणि स्थानिक कारणे असू शकतात:
- राजकीय स्थैर्य व व्यापक संधी: भाजप सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर विस्तारत आहे. त्यामुळे पक्षाच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे काम करण्याची, सत्ता आणि संसाधनांमध्ये सक्रिय सहभाग मिळवण्याची संधी मिळते.
- स्थानिक राजकारणातील बदलती समीकरणे: पाचोरा-भडगाव मतदारसंघात स्थानिक गटांतर्फे आणि कुटुंबांमध्ये स्पर्धा दिसून येते. पूर्वी त्यांनी भावाच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यामुळे मजबूत पक्षाची साथ मिळवण्यासाठी त्यांनी भाजपची निवड केली असावी.
- ठाकरे गटाशी नाराजी: गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात अंतर्गत मतभेद, स्थानिक नेतृत्वातील वाद, किंवा अपेक्षित नेतृत्व स्थान न मिळाल्याने त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असू शकतो.
- महिला सशक्तीकरणाचा अजेंडा: स्थानिक पातळीवर महिला नेतृत्वांना भाजप जास्त प्रोत्साहन देते, अशी प्रतिमा आहे. त्यामुळे त्यांच्या सामाजिक, राजकीय कार्याला भाजपद्वारे अधिक व्यापक व्यासपीठ मिळेल, असा विश्वास असू शकतो.
- भविष्यकालीन राजकीय ambitions: आगामी निवडणुका आणि सत्तास्थानी भागीदारीसाठी मजबूत पक्षाची जोड ही महत्त्वाची ठरते, हेही एक कारण असू शकते
-
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा











Click it and Unblock the Notifications