मुंबईत अधिवेशन अन् एकनाथ शिंदे दिल्लीत!, भाजपच्या बड्या नेत्यांची भेट, पडद्यामागे नेमकं शिजतंय काय?
Maharashtra Political News : मुंबईत एकीकडे पावसाळी अधिवेशन सुरू असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुपचूप दिल्ली गाठली. त्यानंतर त्यांनी दिल्लीत भाजपच्या बड्या नेत्यांची भेट घेतल्याचे देखील समोर आले आहे, या भेटीमागे नेमकं काय राजकारण काय आहे. पडद्यामागे नेमकं काय शिजतंय, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
महाराष्ट्रात सद्या हिंदी विरुद्ध मराठी वाद!
महाराष्ट्रात सद्या हिंदी विरुद्ध मराठी असा वाद सुरू आहे. त्यातल्या त्यात दोन्ही ठाकरे बंधू मराठीच्या मुद्द्यावरुन तब्बल 20 वर्षाने एकाच व्यासपिठावर आले. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी मिळू शकते, असा दावा राजकीय विश्वलेषकांकडून केला जात आहे. अशातच, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी जय महाराष्ट्राबरोबर जय गुजरात असा नारा दिल्याने राज्यातील वातावरण आणखी तापलं आहे.

फडणवीसांचा राजकीय डाव म्हणजे ठाकरेंची भेट!
एआयएमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी दावा केला की, ठाकरे बंधू एकत्र येण्यामागे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच कारणीभूत आहे, कारण त्यांना एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व आता वाढू द्यायचे नाही. तर आगामी महानगरपालिका तथा जि.प. निवडणुकांमध्ये भाजप वरचढ झाला पाहिजे, यासाठी ही राजकीय खेळी खेळली जात आहे.
दरम्यान, राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या ठिकाणी राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा होऊन मंत्री महोदय हे आमदारांच्या प्रश्नांना उत्तरे देत आहेत. त्यातून मार्ग काढण्याचे काम सुरू आहे. अशातच, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी दिल्ली गाठली.
दिल्ली वारीमागचे नेमकं कारण गुलदस्त्यात!
दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या बड्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्याची माहिती समोर आली आहे. या गाठीभेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे. दिल्लीवारी आणि केंद्रीय नेत्यांच्या भेटीमागचं कारण गुलदस्त्यात आहे.
शिंदेंनी अचानक केलेल्या या दिल्लीवारीमुळे नेत्यांच्या भुवया उंचावल्या असल्याचं देखील दिसून आलं आहे. दरम्यान नियोजित असलेल्या कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदे यांनी मंत्री उदय सामंत यांना आणि इतर नेत्यांना पाठवल्याची माहिती देखील समोर आलेली आहे. तर या दौऱ्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र यागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
एकनाथ शिंदे वारंवार का होतात नाराज?
एकनाथ शिंदे यांचे जेव्हा मुख्यमंत्रीपद गेले. त्यानंतर त्यांनी सत्तेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. सत्ता स्थापनेच्या वेळी त्यांनी त्यांची भूमिका न बोलता वेगळी असल्याचे दाखवले. उदय सामंत यांना ते उपमुख्यमंत्री करू पाहत होते. परंतु, देवेद्र फडणवीस यांनी त्याला नकार दिला. त्यानंतर मंत्रीपद वाटपातही त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तर ते अनेकदा त्यांच्या गावी अचानक निघून जातात. त्यामुळे एकनाथ शिंदे हे वारंवार नाराज का असतात, त्यांची सत्तेत गळचेपी होती का, असा सवाल देखील राजकीय वर्तुळात वारंवार विचारला जातोय.












Click it and Unblock the Notifications