Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

29 महापालिकेच्या निवडणुकीच्या कार्यक्रम जाहीर!, निवडणूक आयुक्त काय काय म्हणाले?,वाचा सविस्तर!

State Election Commission Maharashtra : राज्य निवडणूक आयोगाने आज मुंबईसह राज्यभरातील 29 महापालिका निवडणुकांची घोषणा केली. त्यानुसार 15 जानेवारी 2026 रोजी निवडणूक होणार असून, दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे. या घोषणेसह या महापालिकांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी या संदर्भातील घोषणा केली.

  • उमेदवारी दाखल : 23 ते 30 डिसेंबर 2025
  • उमेदवार अर्जांची छाननी : 31 डिसेंबर 2025
  • उमेदवारी मागे घेण्याची मुदत : 2 जानेवारी 2026
  • निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवार यादी : 3 जानेवारी 2026
  • मतदान : 15 जानेवारी 2026
  • मतमोजणी : 16 जानेवारी 2026

मनुष्यबळाची व्यवस्था!

महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी सुमारे 290 निवडणूक निर्णय अधिकारी आणि सुमारे 870 सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची आवश्यकता असून, त्याची पूर्तता करण्यात आली आहे. साधारणत: सुमारे 1 लाख 96 हजार 605 इतक्या निवडणूक अधिकारी कर्मचाऱ्यांची गरज भासेल, तीदेखील व्यवस्था झाली आहे.

आवश्यक तेवढ्या मनुष्यबळाच्या उपलब्धतेबाबत महसूल विभागीय आयुक्त आणि सर्व महानगरपालिका आयुक्त यांना वेळोवेळी निर्देश देण्यात आले आहेत; तसेच त्यासंदर्भात वेळोवेळी संबंधितांच्या बैठकाही घेण्यात आल्या आहेत, असे निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी सांगितले.

ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगासाठी सुविधा!

मतदान केंद्रांवर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, तान्ह्याबाळासह असणाऱ्या स्त्रिया, गरोदर स्त्रिया आदींना मतदानासाठी प्राधान्य दिले जाईल. दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी मतदान केंद्रावर कायमस्वरुपी रॅम्पची व्यवस्था नसल्यास तात्पूर्ती सुविधा उभारली जाईल. व्हिलचेअरचीही व्यवस्था असेल.

मतदान केंद्रावर विजेची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची, सावलीची सुविधा, शौचालयाची व्यवस्था उपलब्ध करून दिली जाईल. सर्व मतदान केंद्रांमध्ये किमान सुविधा असणे आवश्यकच असेल; परंतु याशिवाय शक्य असेल तिथे आदर्श मतदान केंद्र उभारण्याचा प्रयत्न असेल. महिला मतदारांची संख्या जास्त असलेल्या ठिकाणी सर्व निवडणूक अधिकारी- कर्मचारी व पोलिस कर्मचारी महिला असतील, असे मतदान केंद्र 'पिंक मतदान केंद्र' म्हणून ओळखले जाईल. मतदान केंद्राच्या आत मतदारांना मोबाईल दूरध्वनी नेण्यास बंदी असेल, निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी सांगितले.

महानगरपालिका क्षेत्रात आचारसंहिता

निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून संबंधित महानगरपालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात ही आचारसंहिता लागू असली तरी अन्य ठिकाणीदेखील महानगरपालिकेच्या मतदारांवर प्रभाव पाडणारी घोषणा किंवा कृती करता येणार नाही. आचारसंहिता लागू झाल्यामुळे शासनाला महानगरपालिका कार्यक्षेत्राशी संबंधित धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत. नैसर्गिक आपत्तीबाबत करावयाच्या उपाययोजना किंवा मदतीसंदर्भात आचारसंहितेची आडकाठी असणार नाही. राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक असेल. त्याचबरोबर 4 नोव्हेंबर 2025 रोजी कायदा व सुव्यवस्थेसंदर्भातदेखील आदेश निर्गमित केले आहेत.

6 महिन्यांत कास्ट व्हॅलिडिटी सादर करावी!

या निवडणुकांसाठी उमेदवारांना केवळ ऑफलाईन पद्धतीनेच नामनिर्देशपत्र सादर करता येणार आहेत. ज्यांना राखीव जागांवर निवडणूक लढवायची आहे, त्यांना जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. निवड झालेला उमेदवार 6 महिन्यांत जात वैधता प्रमाणपत्र सादर करु शकला नाही, तर त्याची निवड पूर्वलक्षी प्रभावाने रद्द होईल.

या निवडणुकांसाठी एकूण मतदार 3 कोटी 48 लाख 78 हजार 17 आहेत. यांपैकी पुरुष मतदार 1 कोटी 81 लाख 93 हजार 666 इतके आहेत. तर महिला मतदार 1 कोटी 66 लाख 19 हजार 755 तर इतर मतदार हे 4 हजार 590 आहेत. ईव्हीएमच्या माध्यमातून ही निवडणूक पार पडणार आहे. यासाठी 1 जुलै 2025 पर्यंतची मतदार यादी वापरण्यात येणार आहे. एकूण 2869 जागांसाठी निवडणूक होणार आहे.

Maharashtra Municipal  amp amp  Zilla Parishad Election

सर्वोच्च न्यायालयाची मुदतवाढ आणि आयोगाची तयारी

राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायत यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला मुदतवाढ दिली होती.

डेडलाईन

सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला ३१ जानेवारी २०२६ पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.

सध्याची स्थिती

या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची तयारी अधिक वेगाने सुरू केली होती. प्रलंबित असलेल्या या निवडणुका कधी होतील, याकडे सर्व पक्षांचे लक्ष होते. हिवाळी अधिवेशन संपताच लगेच पत्रकार परिषद बोलावल्याने, आज निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता ९९% आहे.

'या' 29 महत्त्वाच्या महानगरपालिकांची निवडणूक होणार!

राज्याच्या विकासासाठी आणि राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या खालील २९ महापालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. यामध्ये मुंबई आणि पुणे, ठाणे, नागपूर यांसारख्या मोठ्या शहरांचा समावेश आहे.

  • विभाग : महानगरपालिका
  • पश्चिम महाराष्ट्र : पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सांगली मिरज कुपवाड, इचलकरंजी
  • मुंबई/कोकण : बृहन्मुंबई (BMC), नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, पनवेल, वसई विरार, उल्हासनगर : भिवंडी निजामपूर
  • विदर्भ नागपूर : अमरावती, अकोला, चंद्रपूर
  • उत्तर महाराष्ट्र : नाशिक, धुळे, जळगाव, मालेगाव
  • मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर, नांदेड वाघाळा, लातूर, परभणी, जालना
  • इतर : सोलापूर, अहिल्यानगर

'या' ३४ जिल्हा परिषदांची निवडणूक होणार

शहरांबरोबरच ग्रामीण भागाच्या विकासाची धुरा सांभाळणाऱ्या राज्यातील ३४ जिल्हा परिषदांच्या (Zilla Parishad Election) निवडणुका देखील प्रलंबित आहेत.

  • विभाग : जिल्हा परिषदा (जि.प.)
  • कोकण : पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
  • पश्चिम महाराष्ट्र : अहिल्यानगर, कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर
  • मराठवाडा : छ. संभाजीनगर, बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी
  • उत्तर महाराष्ट्र : धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव
  • विदर्भ : अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ
More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+