Maharashtra Rain : नाशिक, नंदुरबारसह महाराष्ट्रातील या भागात हवामान विभागाने दिला मुसळधारेचा इशारा
Nashik with North Maharashtra Rain Update News : महाराष्ट्रात तब्बल 12 दिवसांच्या आधीच मान्सून दाखल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. अशातच हवामान विभागाने आज रविवारी सायंकाळनंतर ते सोमवारी पहाटेपर्यंत नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांंमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे लोकांनी देखील सतर्क राहण्याची गरज असल्याचे प्रशासनाने सूचविले आहे.
हवामान खात्याच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, मान्सून (Monsoon Rain Updates) अखेर रविवारी (दि. 25) महाराष्ट्रात दाखल झाला.
विशेष म्हणजे काल शनिवारी मान्सून केरळ मध्ये दाखल झाला होता. त्यानंतर दोन दिवसांत तो महाराष्ट्रात पोहोचेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, राज्यात मान्सूनसाठी अत्यंत अनुकूल परिस्थिती झाल्यामुळे अवघ्या एका दिवसाच्या आतमध्ये मान्सूनने महाराष्ट्रात हजेरी लावली.

महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांना जोरदार व मुसळधार पावसाची शक्यता
दरम्यान, हवामान विभागाने आज आणि उद्या नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. आजपासून शनिवार दि. 31 मे पर्यंत मुंबईसह संपूर्ण कोकणातील 7 जिल्ह्यात जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता आहे. विशेषतः रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर व प्रभाव अधिक राहणार आहे. तर कोकण वगळता खान्देश, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ अशा उर्वरित महाराष्ट्रातील 29 जिल्ह्यात आज व उद्या (रविवार व सोमवारी) जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मंगळवार दि. २७ मे पासून पावसाचा जोर काहीसा कमी होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
नाशकात जोरदार पावसाचा अंदाज
नाशिक जिल्ह्यात पुढील दोन दिवस म्हणजे 27 मे पर्यंत पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यात व घाट क्षेत्रात काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, हलका ते मध्यम पाऊस व सोसाट्याचा वारा प्रतितास 40-50 कि.मी. वेगाने वाहण्याची शक्यता महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी यांनी दिला आहे.
अहिल्यानगरमध्ये येलो अलर्ट
तर यंदा वेळेआधीच पावसाचे आगमन झाल्याने अहिल्यानगर जिल्ह्यात शेती पिकांचे मोठे नुकसान झालंय. शेतकऱ्यांप्रमाणेच जिल्ह्यातील वीटभट्टी चालकांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय. अहिल्यानगर जिल्ह्यात आज म्हणजेच 25 मे रोजी ऑरेंज अलर्ट दिला असून पुढील तीन दिवस येलो अलर्ट राहणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिलेली आहे. अति मुसळधार पाऊस वादळी वारा वीज पडण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
धुळे, जळगाव, नंदुरबारमध्ये पावसाची कशी असेल स्थिती?
धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असून यामुळे काही प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते. मात्र त्यानंतर गेल्या सहा ते सात दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने विश्रांती घेतली असली तरी गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मात्र ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.
दुसरीकडे शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या तयारीला वेग दिला आहे. धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण असून पुढील दोन पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
-
केंद्रीय विद्यालयात प्रवेशाची सुवर्णसंधी! 2026-27 सत्रासाठी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; वाचा डिटेल्स -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
Eid mubarak 2026 wishes messages marathi ईदचे 25 खास शुभेच्छा संदेश; व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम मेसेसेज -
'धुरंधर-2' मोडणार सर्व रेकॉर्ड्स! पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर नोटांचा पाऊस; आकडा पाहून व्हाल थक्क! -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
शाहरुखच्या ताफ्यात धोनीच्या 'धुरंधरांची' एन्ट्री? IPL 2026 पूर्वी केकेआरला मोठा धक्का आणि खूशखबरही! -
महाराष्ट्राची एपस्टीन फाईल उघडली? अशोक खरात प्रकरणी संजय राऊतांचा 'वार', चाकणकरांवर अंधारेंकडून टीका -
Pink lips home remedies : ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय; 7 दिवसांत मिळवा गुलाबी ओठ! -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त आणि तुमचे राशीभविष्य; नववर्षाचा सूर्य कोणासाठी ठरेल भाग्यवान? -
Dhurandhar 2 : धुरंधर-2 चा बॉक्स ऑफिस धमाका! दुसऱ्याच दिवशी 'एवढा' गल्ला, मोडला जवान, ॲनिमलचा विक्रम







Click it and Unblock the Notifications