'वाघाहून मांजर अशी राहुल गांधींची अवस्था', मोदींनी त्यांना कचाट्यात पकडलंय, आंबेडकरांचा हल्लाबोल
Prakash Ambedkar Attacks On Rahul Gandhi : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तसेच पुण्यातील स्वारगेट बसस्थानकातील अत्याचार घटनेनंतर राज्यसरकारचे देखील कान टोचले.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे नांदेड येथे आयोजित माता रमाई यांच्या जयंती कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यसरकारच्या कारभारावर निशाणा साधला. पुढे बोलताना ते म्हणाले की, सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश गवई यांनी आरक्षणा बाबत एक निर्णय दिला आहे. ज्यांना आरक्षण मिळाले आहे, योजनेचा लाभ मिळाला आहे, त्यांना यापुढे लाभ मिळणार नाही. न्यायधीशाच्या या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने समिती स्थापन केले आहे. सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून आरक्षणाचा हा खेळ सुरु असल्याचा घणाघात त्यांनी केला.

राहुल गांधींवर काय म्हणाले बाळासाहेब?
राहुल गांधी यांची वाघाहून मांजर अशी अवस्था नरेंद्र मोदींनी केली आहे. मोदींनी सरळ सांगितले, तोंड उघडल्यास तिहारी जेल मध्ये टाकेल. स्वतः साठी की तुमच्या साठी लढेल. इथं असलेल्या गोष्टी राहुल गांधी यांनी वाऱ्यावर सोडले. आपलं डोकं आपल्या खांद्यावर राहील पाहिजे. आपली मान दुसऱ्याच्या खांद्यावर असता कामा नये. कधी सूरी फिरेल हे कळत नाही, असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधी यांचा समाचार घेतला.
तर संविधान बदलणारे लोक लोटांगण घालतील
आंबेडकर पुढे म्हणले की, विश्वनाथ प्रतापसिंग यांनी ओबीसीना आरक्षण दिले, मागचे पाच वर्ष बघत असाल सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून आरक्षणाचा हा खेळ सुरु आहे. ज्या दिवशी अंतिम निकाल लागेल, तेव्हा राजकीय आणि नोकरीतील आरक्षण ओबीसीचे निघून गेलेले असेल असे देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले.
देशात दोन्ही बाजूने संकट आहे, एकीकडे व्यवस्थेने दिलेली सुरक्षितता काढण्याचा भाग सुरु आहे आणि दुसरीकडे राज्य आणि केंद्रात सत्तेत बसलेले नेते म्हणत आहेत. आम्ही या देशाचे संविधान बदलू. काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी, भाजप आणि आरएसएस हे आरक्षण विरोधी आहेत. त्यागाची भूमिका करायची असेल तर आमचे मत आता त्यांना नाही. हे निश्चय झाला पाहिजे, असे आवाहन देखील त्यांनी केले.
पुणे अत्याचार प्रकरणावर काय केले विधान?
पुण्यातील स्वारगेटच्या घटनेवर आंबेडकर म्हणाले, अशा घटना फक्त स्वारगेट नाही तर अनेक ठिकाणी झाल्या आहेत. बस स्टॅन्डच नाही तर कुठलाही परिसर सुरक्षित नाही. त्याच कारण म्हणजे हे ज्या पद्धतीने महिलांच्या बाबतचा प्रचार करताय ,उपभोगाची वस्तु म्हणून आरएसएस, भाजप तत्वज्ञान सांगत आहेत त्यातून अशी मानसिकता विकसित होणारच आहे.












Click it and Unblock the Notifications