Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

महाराष्ट्रात विकास, न्यायाचा विजय - PM मोदी; काँग्रेसवर वार! ठाकरेंनी धोका दिल्याचा पुन्हा उल्लेख!

Maharashtra Jharkhand Election Result 2024 PM Modi addressing to party Leader : "महाराष्ट्रात विकास, न्यायाचा विजय झाला असून विभाजनवादी हरले अशी प्रतिक्रीया महायुतीच्या विजयानंतर PM मोदींनी दिली. ते सध्या पक्षाचे कार्यकर्ते, नेते पदाधिकारी आणि जनतेला संबोधन करत आहेत.

Maharashtra Jharkhand Election Result 2024 PM Modi addressing to party Leader

महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षाने निर्भेळ यश प्राप्त केले, यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्यांदाच पक्ष कार्यालयातून पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जनतेशी संबोधन करत आहेत. भाजपवर लोकांनी विश्वास दाखवला हेही ते म्हणाले.

घराणेशाहीचा पराभव

पंतप्रधान मोदी म्हणाले, महाराष्ट्रात लांगलूचालन करणाऱ्याला जनतेने धडा शिकवला आहे. घराणेशाहीचा पराभव झाला. मागच्या पन्नास वर्षात कोणत्याही पक्षाला आणि कोणत्याही प्री-पोल अलायन्ससाठी हा सर्वात मोठा विजय आहे. साठवर्षानंतर आपण भाजपला तिसरीवेळ संधी दिली असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, जनतेचा आमच्या सुशालनाच्या प्रतिमानावर विश्वास आहे आणि त्यात आम्ही काहीही कसर ठेवणार नाही. महाराष्ट्रातील जनता जनार्धनाचे मी विशेष अभिनंदन करत आहे. कारण सलग तीनवेळा भाजपप्रणित सरकारला विजयी करुन देण्याचे श्रेय दिले आहे.

उद्धव ठाकरेंवर कठोर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. यावेळी ते म्हणाले की, आमच्यासोबत ते होते पण बहुमत मिळून ही त्यांनी आम्हाला धोका दिला होता त्यांना जनतेने बाजूला सारले आहे. लागुंलचालन करणाऱ्याला शिवरायांनी धडा शिकवला होता हे आज पुन्हा महाराष्ट्राने दाखवून दिले आहे.

'एक हैं तो सेफ हैं' चा पुन्हा नारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली, ते म्हणाले, संविधान, आरक्षणाच्या नावाने नॅरेटीव्ह सेट केले होते पण या निवडणुकीत महाराष्ट्राने अशा लोकांना पुन्हा बाजूला सारले. म्हणजेच महाराष्ट्रातील जनतेनेही सांगितले की, एक हैं तो सेफ है.. धर्म, जाती पातीच्या नावाने लढणाऱ्यांना महाराष्ट्रातील जनतेने उत्तर दिले.

आमचे मराठी भाषेवरचे प्रेम महाराष्ट्राने पाहीले

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, काँग्रेस समाजात फुट पाडण्याचे काम करत होते. महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला निवडून देण्याचे कारण म्हणजे विकास आणि आमचे काम होय. छत्रपती संभाजी महाराज आमची प्रेरणा आहे, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचे विचार आमच्या व्यवहारात आहे. आमच्या सरकारने मराठीला अभिजात दर्जा दिला. संस्कृतीचा सन्मान केला आहे. मी तर नेहमी सांगतो की, मातृभाषेचा सन्मान म्हणजे आपल्या आईचा सन्मान. त्यासाठीच मी विकसित भारतासाठी लाल किल्ल्यावरुन पंचप्राणाची हाक दिली.


(ही बातमी अपडेट होत आहे...)

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+