Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

राज्यभरात अनेक ठिकाणी पुरपरिस्थिती,पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली

मुंबई : राज्यातील अनेक जिल्हात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. पुणे, सातारा, रायगड, पालघर, सांगली या जिल्ह्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे पुणे, सांगलीत पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर कोल्हापुरातील पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 43 फुटांवर गेली आहे. राधानगरी धरण देखील 98 टक्के पेक्षा जास्त भरले आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे आज उघडण्याची शक्यता आहे. यामुळे अनेक जिल्हा आणि राज्य मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.

सांगलीत 24 तासात 172 मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या पाच सहा दिवसापासून चांदोली धरण परिसरामध्ये सलग अतिवृष्टीचा पाऊस पडत आहे. इचलकरंजीमधील पंचगंगा नदीचे पाणी धोक्याच्या पातळीवर आलं आहे. यामुळे पूरग्रस्त भागातील नागरिकांना स्थलांतरित करण्याचे आदेश देण्यात आले आहे. राधानगरी धरण 94 टक्के भरले आहे. शहरातील बागवानपट्टी शेळके मळा परिसरात पुराचे पाणी येऊ लागले. इचलकरंजी कर्नाटकची जोडणारा रस्ता पुराच्या पाण्याखाली गेला आहे.

Mithi River

पुणे शहरातील काही भागात कंबरेइतकं पाणी साचलं आहे. तसेच सिंहगड रोड परिसरातील अनेक घरात पाणी शिरलं आहे. त्यामुळे नागरिकांचे धान्य आणि घरातील साहित्य पाण्याने खराब झालं आहे. प्रशासनाकडून पाण्यात अडकलेल्या लोकांना रेस्क्यू करण्यात येत आहे. प्रशासनाकडून नागरिकांना घरातच रहा सल्ला देण्यात आला आहे. खडकवासला धरण 100 टक्के भरल्याने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. आज पुन्हा एकदा पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. आज पुण्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

अनेक जिल्ह्यात शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

मुंबई विद्यापीठाच्या आज 25 जुलै 2024 रोजी सकाळी आणि दुपारच्या सत्रात होणाऱ्या फक्त या तालुक्यातील सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या सर्व परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील. ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आवश्यकता असेल तरच बाहेर पडण्याचे जिल्हाधिकारी यांनी आवाहन केले आहे.उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली, जांभूळ पाडा इथे धोक्याची पातळी ओलांडली आहे. धोक्याच्या पातळीच्या वर 1 मीटर वरून वाहत आहे उल्हास नदीच्या आसपास असणाऱ्या सर्व गावांना, शहरांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+