Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

महाराष्ट्र धावतोय, विकास दिसतोय; बुलेट ट्रेन- मेट्रो ट्रेन हे मुख्यमंत्र्यांचे स्वप्न

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 3 मार्च रोजी नवी मुंबईतील कल्याण ते तळोजा यांना जोडणाऱ्या मेट्रो लाइन-12 ची पायाभरणी केली. त्यानंतरही ठाणे, पुणे आणि नागपूर या शहरातील मेट्रो विस्तारित झाली. महायुती सरकारच्या काळात महाराष्ट्रात बुलेट ट्रेन येण्याचे स्वप्न पूर्ण झाले.

मेट्रोचे जाळेही आता विस्तारत आहे. पायाभूत सुविधांच्या विकासात आणि आर्थिक विकासाच्या महाराष्ट्र सध्या मोठी झेप घेत आहे. मुंबई महानगर प्रदेश सातत्याने प्रगती करत आहे. मेट्रोचे जाळे विस्तारले तर महानगरांतील प्रवास सुखद होते. वेळेची, पैशाची व इंधनाची बचत होते, हे साधे सूत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अबवंबिलेले दिसले.

Cm Eknath Shinde

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम सुरु

मुंबई ते अहमदाबाद या 508 किमी लांबीच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सध्या सुरू आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र, गुजरात, दीव-दमण येथे पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात गुजरातमध्ये आठ आणि महाराष्ट्रात चार स्थानके बांधण्यात येतील. महाराष्ट्रातील वांद्रे - कुर्ला संकुल, ठाणे, विरार आणि बोईसर ही स्थानके होणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने या कामात लक्ष घातले असून यामुळे मुंबईच्या विकासास चालना मिळणार आहे. बोईसर हे मुंबई महानगर प्रदेशातील सर्वात मोठे औद्योगिक उपनगर आहे. लवकरच या औद्योगिक उपनगराला बांधकामाधीन बोईसर बुलेट ट्रेन स्थानकाशी जोडून चालना मिळणार आहे. बुलेट ट्रेन सुरू झाल्याने मुंबईच्या मध्यवर्ती भागातील वांद्रे - कुर्ला संकुल - बोईसरदरम्यानचा एकूण प्रवास 36 मिनिटांत होणार आहे.

बुलेट ट्रेनवर मुख्यमंत्र्यांचे जातीने लक्ष

देशातील पहिल्या बुलेट ट्रेनसाठी वांद्रे-कुर्ला संकुल येथील भूमिगत स्थानक ते शिळफाटा दरम्यान 21 किमी लांबीचा भारतातील पहिला समुद्राखालील भुमिगत बोगदा बांधण्यात येत आहे. बोगद्याच्या 21 किमीपैकी 16 किमी टनेल बोरिंग मशिनद्वारे तर उर्वरित 5 किमी एनएटीएमद्वारे करण्यात येत आहे. यात ठाणे खाडीतील 7 किलोमीटरच्या समुद्राखालील बोगद्याचाही समावेश आहे. या सर्व कामांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जातीने लक्ष ठेऊन आहेत. भारतातील हा पहिला भुमिगत बोगदा असल्याने याबाबत संपूर्ण जगाला उत्सुकता आहे.

मेट्रोसाठी मुख्यमंत्र्यांचा मास्टरप्लॅन

2014 पूर्वी देशातील केवळ पाच शहरात मेट्रो रेल्वे होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात देशातील 21 शहरांत मेट्रो सुविधा देण्यात आल्या आहेत. त्यात महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर आणि पुणे या तीन शहरांचा समावेश आहे. महायुती सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात या तिन्ही मेट्रो सिटींना विस्तारीत करण्यासाठी वेगवेगळे प्लॅन आखले. महाराष्ट्रात आचारसंहिता लागण्यापूर्वी केंद्र सरकारने ठाण्यात नवीन 29 किलोमीटर लांब मेट्रो रेल्वे सेवा सुरु करण्यास मंजूरी दिली. यामध्ये नवीन 22 स्टेशन असतील. शहरातील पश्चिम भागातील नागरिकांना शहरातील इतर भागासाठी जोडण्यात येईल. या नेटवर्कमध्ये एका बाजूला उल्हास नदी तरी दुसऱ्या बाजूला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान असेल. या प्रकल्पासाठी 12,200 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत आहे.

पुण्यातही आणखी विस्तारणार मेट्रोचे जाळे

पुण्यात नवीन मार्गावर मेट्रो धावेल. त्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूरी दिली आहे. त्यासाठी 2,954.53 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प पुणे मेट्रो फेज 1 चा विस्तारीत प्रकल्प असेल. त्याची लांबी 5.46 किमी पर्यंत असेल. यामध्ये तीन भूमिगत स्टेशन असतील. मार्केट यार्ड, बिबवेवाडी, बालाजी नगर आणि कटराज या मुख्य भागांना ही मेट्रो जोडणार आहे. पुणेकरांना वाहतूक कोंडीतून सूटका करण्यासाठी, सहज आणि गतिमान प्रवाशासाठी हा नवीन पर्याय असेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मेट्रोचे जाळे विस्तीर्ण करण्यावर भर दिला. यामुळे मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरकरांची नित्याच्या वाहतुकीच्या कोंडीतून समस्येतून सुटका होणार आहे.

विकसीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांचे स्वप्न

रस्ते सुधारले तर शहरे सुधारतात. शहरांत मेट्रो आली, तर उत्पन्न मिळते आणि उत्पन्नांतूनच राज्य प्रगती करते, हे साधे सूत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहिले. त्यानुसार आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या पहिल्याच कार्यकाळात त्यांनी राज्यातील मेट्रो शहरांची संख्या वाढविण्याचे नियोजन केले. केंद्रात मोदी सरकारकडे पाठपुरावा करुन मुंबई, पुणे, नागपूर येथील मेट्रोचे जाळे आणखी विस्तारले.

आगामी काळात संभाजीनगर, नाशिक आदी शहरांतही मेट्रो पोहोचू शकणार आहे. मेट्रोच्या निर्मीतीनंतर रस्त्यावरील वर्दळ कमी होऊन वाहतूक कोंडीचा त्रास कमी होतो. त्यामुळे शहरांचा विकास करण्यासाठी मेट्रोची संकल्पना महायुती सरकरने राबवली. आगामी काळात महायुती सरकार आल्यास महाराष्ट्रातील किमान 10-15 शहरांत मेट्रोचे जाळे पसरलेले दिसल्यास, नवल वाटू नये.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+