Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

महाराष्ट्र दिनी नाशिकमध्ये मंत्री गिरीष महाजन ध्वजवंदन करणार तर रायगडमध्ये मंत्री आदिती तटकरे

maharashtra day 2025 : महायुती सरकारमध्ये नाशिक आणि रायगढ जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरुन रस्सीखेस सुरु आहे. या दोन्ही जिल्ह्याला अजून पालकमंत्री देण्यात आला नाही. हा पालकमंत्री पदाचा वाद केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या बैठकीत सुटला नाही. उद्या 1 मे रोजी साजऱ्या होणाऱ्या महाराष्ट्र दिनानिमित्त नाशिकमध्ये भाजपचे मंत्री गिरीश महाजन ध्वजवंदन करणार आहेत तर रायगडमध्ये मंत्री आदिती तटकरे यांना हा मान मिळाला आहे. मात्र, या निर्णयामुळे नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुती आघाडीतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

girish mahjan and aditi tatkar

नाशिकमध्ये शिवसेनेचे नेते दादा भुसे आणि रायगडमध्ये भरत गोगावले यांनी पालकमंत्रिपदासाठी दावा केला असताना, सरकारकडून गिरीश महाजन आणि आदिती तटकरे यांची निवड करण्यात आली आहे. मात्र, या निर्णयामुळे महायुती आघाडीतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी शिवसेना नेते दादा भुसे यांनी दावा केला असताना, सरकारने गिरीश महाजन यांचीच निवड केल्याने शिंदे गटात नाराजी पसरली आहे. शिवसेनेचे नेते आणि मंत्री दादा भूसे यांना अमरावती जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

महायुतीत पुन्हा मानपानावरुन नाराजी

महाराष्ट्र दिन हा 1 मे 1960 रोजी राज्याच्या स्थापनेपासून साजरा होणारा एक महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री ध्वजवंदन करतात आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. 1 मे रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री ध्वजवंदन करतात. यंदा नाशिकमध्ये हा मान गिरीश महाजन यांना देण्यात आला आहे. परंतु, नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीतील भाजप आणि शिवसेना यांच्यातील तणाव वाढला आहे.

रायगडमध्ये ध्वजवंदनाचा मान मंत्री आदिती तटकरे यांना

यंदा नाशिकमध्ये गिरीश महाजन आणि रायगडमध्ये आदिती तटकरे यांना ध्वजवंदनाचा मान देण्यात आला आहे. परंतु, या निर्णयामुळे महायुतीतील तणाव वाढला आहे. जानेवारी 2025 मध्ये सरकारने गिरीश महाजन यांना नाशिकचे आणि आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्री म्हणून नियुक्त केले होते. मात्र, शिवसेनेने याला तीव्र विरोध केला होता. दादा भुसे यांनी नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी दावा केला होता, कारण ते मालेगाव बाह्य मतदारसंघाचे आमदार आहेत आणि नाशिकशी त्यांचा जवळचा संबंध आहे. तसेच, रायगडमध्ये भरत गोगावले यांनीही आपला हक्क सांगितला होता, कारण रायगडमध्ये शिवसेनेचा प्रभाव जास्त आहे.

या वादामुळे जानेवारी 2025 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नियुक्त्यांना स्थगिती दिली होती. दरम्यान महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ध्वजवंदनासाठी पुन्हा महाजन आणि तटकरे यांचीच निवड करण्यात आली आहे, ज्यामुळे शिवसेनेत पुन्हा नाराजी पसरली आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिक आणि रायगडच्या वार्षिक योजनेच्या बैठका स्थगित केल्या होत्या, कारण या वादामुळे प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत होता. शिवसेनेच्या मते, नाशिकमध्ये त्यांचे सात आमदार आहेत तर भाजपचे फक्त पाच आणि रायगडमध्येही त्यांचा प्रभाव जास्त आहे, त्यामुळे पालकमंत्रिपद त्यांनाच मिळायला हवे.

फेब्रुवारी 2025 मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या तयारीसाठी बैठक घेतली होती. त्यावेळी या बैठकीला गिरीश महाजन उपस्थित राहिले नव्हते. तसेच, दादा भुसे यांनीही महाजन यांनी बोलावलेल्या बैठकीकडे पाठ फिरवली होती. या वादामुळे 2027 मध्ये नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिवसेनेच्या मते, नाशिकमध्ये त्यांचा प्रभाव जास्त आहे, तर भाजपचा दावा आहे की, गिरीश महाजन यांच्यासारखा अनुभवी नेता कुंभमेळ्यासारख्या मोठ्या आयोजनासाठी योग्य आहे.

गिरीश महाजन हे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि जलसंपदा मंत्री आहेत. त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे समजले जाते. नाशिकच्या झेंडावंदनाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली असल्याने एक प्रकारे त्यांच्याकडेच पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली जाणार याचे संकेत देण्यात आले आहेत. तरी शिवसेनेच्या नाराजीमुळे हा निर्णय सतत वादात राहिला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+