Maharashtra Session : अजित पवारांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी काय केल्या घोषणा, वाचा 10 पॉईंट्स
अजित पवार यांनी महाराष्ट्र अर्थसंकलप सादर केला आहे. यात त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा केलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. परंतु, शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय़ाबाबत त्यांनी कोणतीही घोषणा केली नाही. चला तर शेतकऱ्यांना काय घोषणा केल्या त्या खालील दहा पॉईंटमधून समजून घ्या...!
मराठवाडा वॉटर ग्रीड आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांच्यावतीनं राबवणार
- छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प सातारा जिल्ह्यातील मान्याची वाडी आणि टेकाची वाडी मध्ये प्रायोगिक तत्वावर
- जलजीवन मिशन 1 कोटी 30 लाख कुटुंबांना नळ जोडणी देण्यात आली
- मराठवाडा वॉटर ग्रीड आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांच्यावतीनं राबवणार, 37 हजार कोटींचा खर्च
- सातारा जिल्ह्यातील मान्याचीवाडी व टेकवडी या गावांना "सौरग्राम" म्हणून घोषित केले असून त्यांच्यासह अन्य 8 गावांचे सौर ऊर्जेद्वारे १०० टक्के विद्युतीकरण करण्यात येणार आहे.
- वैद्यकीय महाविद्यालये आणि आरोग्य संस्थांसह राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सौर विद्युत यंत्रणा स्थापित करण्यात येणार आहे.
- आनंदवनच्या अनुदानात वाढ करण्यात येणार आहे.

Ajit Pawar : 27 जिल्ह्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी वीज योजना..
- 27 जिल्ह्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी वीज योजना ऑक्टोबर 2026 पर्यंत प्रकल्प पूर्ण होणार
- 2 लाख 90129 सौर कृषी पंप स्थापित करण्यात आले आहेत. बी बियाणं यंत्र सामृग्रीसाठी शेत व पाणंद रस्त्याच्या विकासासाठी योजना,
- रामटेकच्या धर्तीवर विकास केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत २ लाख १३ हजार ६२५ लाभार्थी शेतकऱ्यांना येत्या दोन वर्षांसाठी २५५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
Ajit Pawar : नद्या जोड प्रकल्पाला राज्य सरकारचं प्राधान्य
- नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाव्दारे नाशिक व जळगाव जिल्हयातील 49 हजार 516 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे. या प्रकल्पाची अंदाजित किंमत 7 हजार 500 कोटी रूपये आहे.
- दमणगंगा -एकदरे -गोदावरी या नदीजोड प्रकल्पामुळे 3.55 टीएमसी पाणी उपलब्ध होणार असून त्यामुळे जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रातील 9 हजार 766 हेक्टर क्षेत्र पुनर्स्थापित होईल.
- नाशिक जिल्ह्यातील 2 हजार 987 हेक्टर क्षेत्रालाही यामुळे सिंचनाचा लाभ होईल. या प्रकल्पाची अंदाजित किंमत 2 हजार 300 कोटी रूपये आहे.
मुख्यमंत्री मोफत बळीराजा वीज योजनेत डिसेंबर 7978 कोटींची सवलत
- जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत ५ हजार ८१8 गावांमध्ये 4 हजार 227 कोटी रुपये किंमतीची 1 लाख 48 हजार 888 कामे हाती घेण्यात आली आहेत.
- अभियानातील सर्व कामे मार्च, 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत.
- मुख्यमंत्री मोफत बळीराजा वीज योजनेत डिसेंबर 7978 कोटींची सवलत देण्यात आली आहे.
अपूर्ण जलसिंचन प्रकल्पांच्या कामासाठी 5000 कोटींचा खर्च करणार
- नानाजी देशमुख प्रकल्पासाठी 351 कोटी 42 प्रस्तावित,
- एआय वापर धोरण आखले जाणार आहे.
- शेतकऱ्यांना पीक नियोजन, उत्पादन खर्च कमी करणं, उत्पादकता वाढवणं, शेतमालाला हक्काची बाजारपेठ उपलब्ध करुन देणे. यासाठी एआय वापरणार, पहिल्या टप्प्यात 50 हजार शेतकऱ्यांसाठी प्रकल्प सुरु होणार, यासाठी 500 कोटी रुपये.
- कालवे वितरण सुधारण्यासाठी 5000 कोटीची कामे मंजूर
- जलयुक्त शिवार 2.0 यासाठी 5518 गावात 4227 कोटींची कामंहाती घेण्यात आली आहे. यातील कामं 2026 पर्यंत पूर्ण होतील.
- राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्पांची कामे पूर्ण करणे आणि महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत कालवे वितरण प्रणालीतील सुधारणेची सुमारे 5 हजार कोटी रुपये किमतीची कामे नाबार्ड अर्थसहाय्याच्या पहिल्या टप्प्यात मंजूर करण्यात आली आहेत.












Click it and Unblock the Notifications