गेल्या 4 महिन्यांत राज्यात 1 हजार 68 शेतकऱ्यांच्या आत्महत्या - विजय वडेट्टीवार
नागपूर : राज्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबत नसून गेल्या गेल्या 4 महिन्यांत 1068 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज केला.

या शेतकऱ्यांच्या कुटुबांना आर्थिक मदतीची गरज असताना सरकारने भारतीय विश्वकप विजेत्या संघाला एवढी मोठी रक्कम देण्याची गरज नव्हती अशी टीकाही त्यांनी केली.
#WATCH | Nagpur: Maharashtra Assembly LoP Vijay Wadettiwar says, "... In the last 4 months, 1068 farmers have committed suicide. It would have been good had they given money to the distressed farmers. They gave such a huge sum to the Indian Cricket Team, what was the need?...… pic.twitter.com/icoelZKMGz
— ANI (@ANI) July 6, 2024
वडेट्टीवार म्हणाले, आम्ही आरटीआयअंतर्गत सरकारला माहिती विचारली. त्यातून धक्कादायक बाब समोर आली आहे. मागच्या चार महिन्यात 1 हजार 68 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. ही गंभीर बाब आहे, परंतू सरकारने विश्वकप विजेत्या भारतीय संघाला भली मोठी रक्कम दिली. त्यांना एवढी रक्कम देण्याची गरज नव्हती.
वडेट्टीवार म्हणाले, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला पैसे देण्याची गरज होती. खेळाडूंची पाठ थोपटण्यासाठी पैसे देण्याची गरजच नव्हती. ते पैसे शेतकरी, गरीबांना द्यायला हवे होते. ती त्यांची गरज होती. पण सरकारने तसे केले नाही.
..ते स्वतःसाठी नव्हे देशासाठी खेळतात
वडेट्टीवार म्हणाले, भारतीय खेळाडू स्वतःसाठी खेळत नाही ते देशासाठी खेळतात. त्यामुळेच दहा कोटी लोक रस्त्यावर आले होते. भारतीय संघाला 120 लाख रुपये बक्षीस दिले आहे.
आधीच राज्य कर्जाच्या खाईत
वडेट्टीवार म्हणाले, तरुणांचे भविष्य धोक्यात आले आहे, शेतकरी संकटात आहेत आणि सरकार खेळाडूंवा मोठ्या प्रमाणात पैसे देत आहेत.महाराष्ट्र आधीच 7.92 लाख कोटी रुपयांच्या कर्जाखाली आहे आणि लाडकी बहिण योजनेसाठी ते आणखी एक लाख कोटी रुपये खर्च करणार आहेत. राज्याची कायदा व सुव्यवस्था नियंत्रणाबाहेर गेली आहे.ड्रग्जमुळे तरुणाई धोक्यात आली आहे. आणि राज्य सरकार बनवण्यात व्यस्त आहेत.












Click it and Unblock the Notifications