Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

भाजप विधानसभेला लढवणार इतक्या जागा? मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीबाबत देणार धक्कातंत्र!

मुंबई:लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपची पिछेहाट झाली. निवडणुकीत सपाटून मार खाल्लेला भाजप आता प्रत्येक पाऊल सावधगीरीने टाकत आहे. आता भाजपने विधानसभा निवडणुकीचे सूत्र ठरवल्याची माहिती असून भाजप मागच्या निवडणुकीत लढवलेल्या जागां इतक्याच यावेळी ते लढवणार असून मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराचा चेहरा मात्र नंतर ठरवणार असल्याची शक्यता आहे.

भाजपचा सावध पावित्रा

महाराष्ट्रात शिवसेनेला भाजपने खिंडार पाडल्याचे बोलले जाते, तसे आरोपही उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि नेत्यांकडून सातत्याने होतात. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार पडले आणि महायुतीचे सरकार स्थापन झाले. यातच अजित पवारांना भाजपने सोबत घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसलाही तडे गेले.

Maharashtra Assembly Election BJPs Seat Allocation Strategy

यादरम्यान, लोकसभा निवडणुका झाल्या. त्यात भाजपला मोठा दणका बसला. यामुळे भाजपची महाराष्ट्रात पिछेहाट झाली, हे शल्य राज्यातील आणि केंद्रातील नेत्यांना आहे. त्यामुळेच आता भाजप प्रत्येक पाऊस सावध टाकत आहे.

भाजप लढवणार एवढ्या जागा?

महायुतीतील मोठा भाऊचा वाद लोकसभा निवडणुकीनंतर वाढला होता. तो आता काहीसा शमल्याचे चित्र आहे. यातच भाजपने राज्यात ऑक्टोबर-नोव्हेंबर काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत 155 ते 160 जागा लढवण्याचा निर्धार केला, अशी माहिती समोर आली आहे. यामुळे भाजपच महायुतीत मोठा भाऊ हे आधीच पक्के असून यावर पडदा पडला आहे.

155 पेक्षा कमी जागा लढवायच्या नाहीत

भाजपने एक सूत्र ठरवले की, मागच्यावेळी जेवढ्या जागा लढवल्या, त्यापेक्षा कमी या विधानसभा निवडणुकीत जागा लढवायच्या नाही. म्हणजेच मागच्यावेळी लढवलेल्या जागांएवढ्याच विधानसभेच्या 155 पेक्षा कमी जागा कोणत्याही परिस्थितीत लढवायच्या नाहीत. अशी भूमिका त्यांनी घेतल्याचे समजते. 'दैनिक लोकमत'मध्ये याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे महायुतीमधील शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला अवघ्या 133 जागाच येण्याची शक्यता आहे.

अजित पवार-शिंदेंना एवढ्या जागा

भाजपने 155 जागा लढवल्यास महायुतीमधील उर्वरित घटकपक्षांसाठी जागा सोडाव्या लागतील. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षाला १३३ च्या निम्मे ६६ -६६ जागा येऊ शकतात. एका अर्थाने अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे अनुक्रमे 80 ते 100 जागा लढवण्याचे स्वप्न अधुरेच राहण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्रीपदाबाबत धक्कातंत्र

भाजपने देशात आतापर्यंत जेव्हा स्वबळावर निवडणूक लढवली तेव्हा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केल्याचे दिसते. पण त्यानंतर जेव्हा-जेव्हा युती केली तेव्हा त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार अचानक धक्कातंत्र वापरुन दिला आहे. निवडणूक झाल्यानंतर मोदी-शाह धक्कातंत्राचा वापर करुन कोणालाही अपेक्षित नसलेल्या नेत्याची मुख्यमंत्रीपदी निवड करतात, हा पॅटर्न अलीकडे काही राज्यांमध्ये दिसून आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही भाजप याच धोरणाचा वापर करेल, असे सांगितले जात आहे.

भाजपची रणनिती

महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणायची, हे भाजपचे स्वप्न आहे. मात्र, त्यासाठी 288 जागा स्वतंत्रपणे लढवणे आतातरी शक्य नाही. त्यासाठी अडीच वर्षांची तयारी लागते. ती वेळ आता गेली, त्यामुळे महायुतीमध्ये जे आमदार ज्या पक्षातून निवडून आले आहेत, त्यांच्या जागा कायम ठेवून उर्वरित जागांबाबत बोलणी करण्याचे धोरण भाजपने स्वीकारल्याची माहिती आहे. तसेच विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर न करता सामूहिक नेतृत्त्वाखाली लढायचे, अशी भाजपची रणनीती आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+