Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

राजकारणाचं काही खरं नाही भाऊ! 22 निवडणुका लढल्या, 7 एकर बागायत जमीन विकली, वसमतच्या उमेदवाराची कथा

Maharashtra Assembly Election 2024 : कोर्टाची पायर चढणं येऱ्यागबाळ्याचं काम नाही, कोर्टाची पायरी शहाण्यांनी चढू नये अशी म्हण आपल्याकडे सर्वश्रृत आहे पण हीच म्हण आता राजकारणाला लागू होत आहे असेच म्हणावे लागेल. याला कारणही तसेच आहे. राजकारणापायी एखाद दुसरा प्लाॅट नव्हे तर चक्क सात एकर बागायची जमीन गेल्याची बाब आता समोर आलीय. म्हणजे राजकारणात येण्याचे स्वप्न सामान्यांच्या आवाक्यात राहीले नाही असेच म्हणावे लागेल.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. या निवडणुकीत जवळपास आठ हजार उमेदवार मैदानात आहेत. 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदानप्रक्रीया पार पडेल तर 23 नोव्हेंबरला निकाल हाती येणार आहेत. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे पण तिकीट देण्यासंदर्भात विचार केल्यास आपले नातेगोते, भाऊ, बहिण आणि जवळच्या लोकांनाच तिकीट जास्त दिली गेल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे निवडणुका हा आता सामन्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या असेच म्हणावे लागेल.

Maharashtra Assembly Election 2024

एकाच व्यक्तीने लढल्या 22 निवडणुका

हा एक मुद्दा झाला पण सामान्या माणसांनी निवडणुका लढवल्या तर काय होऊ शकते याचे अनेक चांगली आणि काही वाईट उदाहरणेही आहेत. त्यातलेच एक वाईट उदाहरण हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील आहे. या व्यक्तीची कथाच निराळी आहे. एक दोन नव्हे तर तब्बल 22 निवडणुका या व्यक्तीने लढवल्या आहेत पण नशीब एकदाही फळफळलं नाही.

22 निवडणुका लढवणारी व्यक्ती वसमतची

सातत्याने निवडणुकीत पैसा ओतून पराभवच पदरी पडत असेल तर त्या व्यक्तीची आणि कुटुंबाची काय अवस्था होते हे आपण या लेखातून समजून घेऊ शकतो. हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरामधील एका सर्वसामान्य नेता म्हणून लोक या व्यक्तीला ओळखतात. तरुण असताना ते वयाच्या 73 व्या वर्षांपर्यंत त्यांनी निवडणुका लढवल्या आणि त्याही तब्बल 22 विश्वास बसणार नाही पण ही खरी गोष्ट आहे.

ग्रामपंचायत पासून ते लोकसभेपर्यंत निवडणुका लढल्या

वसमत शहरातील रहिवासी असलेले वय 73 दिगंबर नाईकवाडे यांनी आत्तापर्यंत 22 निवडणुका लढल्या आहेत. मागील पन्नास वर्षापासून दिगंबर नाईकवाडे वेगवेगळ्या निवडणुका लढत आहेत. राजकारणातून समाजकार्य करावे, सत्ता आल्यानंतर जनतेचे प्रश्न सोडवता येतील असा विश्वास नाईकवाडे यांना होता. त्यामुळे दिगंबर नाईकवाडे यांनी ग्रामपंचायत पासून ते लोकसभेपर्यंत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका ,विधानसभा आणि लोकसभा अशा वेगवेगळ्या 22 वेळा निवडणुका लढवल्या आहेत. 1995 या काळात विधानसभा निवडणुकांसाठी दिगंबर नाईकवाडे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज भरला होता.

निवडणुकीसाठी 7 एकर बागायती विकली

राजकारण करण आणि त्यात पैसा ओतणं हे सामान्य काम नाही ते तेवढेच अवघड काम आहे. निवडणुका म्हटलं की पैसा आलाच आणि नाईकवाडे यांच्याकडे तर पैसा नव्हता. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे बागायती शेती असलेली सात एकर शेती विकण्याचा निर्णय घेतला. जमीन विकून मिळालेल्या पैशातून निवडणूक लढायची आणि विजयी झाल्यानंतर विकलेली जमीन परत घेऊ असा विश्वास होता. त्यामुळे लाख मोलाचे असलेली रोड लगतची सात एकर बागायती जमीन तेव्हा दिगंबर नाईकवाडे यांनी विकली. त्या जमिनीतून मिळालेला पैसा निवडणुकीच्या प्रचारात कार्यकर्त्यावर पैसे खर्च केला. प्रचारासाठी गाड्या भाड्याने लावणे या विविध कारणासाठी हा पैसा खर्च केला.

शेती गेली आणि पदरी पराभव पडला

नाईकवाडे यांना अपेक्षा होती की या निवडणुकीत त्यांचा विजय होईल. परंतु तसं काही झालं नाही आणि तेव्हा नाईकवाडे पराभूत झाले. स्वतःकडे असलेली बागायती शेती गेली. निवडणुकीतही पराभव झाला. पैसे नसल्यामुळे कार्यकर्ते सुद्धा जवळ फिरकत नव्हते, असे असताना सुद्धा नाईकवाडे यांनी त्यांचे काम न थांबवता सुरूच ठेवले. तेव्हापासून आतापर्यंत हे काम सुरूच आहे.

कार्यकर्ते सोडून गेले

नाईकवाडे यांनी तब्बल 22 निवडणुका लढल्या आहेत. आज त्यांचं वय 73 वर्ष इतकं आहे. बागायती असलेली जमीन विकली त्यामुळे जवळ कोणतीही मालमत्ता राहिली नाही. वडिलांनी जमीन विकली त्यामुळे नाईकवाडे यांच्या मुलांनीही त्यांची साथ सोडली. आता दिगंबर नाईकवाडे आणि त्यांची पत्नी दोन रूमच्या असलेल्या पत्र्याच्या घरात राहत आहेत. या विधानसभा निवडणुकीत नाईकवाडे यांनी पुन्हा एकदा उमेदवारी अर्ज भरला आहे. जवळ असलेले पैसे संपल्याने कार्यकर्ते दूर पाळले. त्यामुळे दिगंबर नाईकवाडे यांनी स्वतः लाऊडस्पिकर मधून प्रचार सुरू केलाय.

राजकारणाचं काही खरं नाही दादा..!

राजकारणात पैसा गेल्यानंतर दिगंबर नाईकवाडे यांचा संसाराचा गाडा आर्थिकदृष्ट्या रुतला आणि तो पुढे नेण्यासाठी त्यांची पत्नी धावून आली. सात एकर जमीन गेली तीच जमीन कोट्यवधी रुपयांची आहे. या कोट्यवधींची संपत्ती राजकारणत गेली आणि त्यांच्या पत्नी शेतामध्ये दोनशे रुपये रोजाने कामाला जाण्याची वेळ आली होती, अशी माहितीही समोर आली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+