5 कोटी जप्त, 10 कोटी डोंगरातून पोहचवले! मुख्यमंत्र्यांन प्रत्येक उमेदवारांना 50 कोटी दिले- संजय राऊत
Maharashtra Assembly Election 2024 : "शिंदे गटांच्या आमदारांना आणि त्यांच्या काही लोकांना 50 कोटींवर रक्कम पोहचवण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यात 15 कोटींचा हप्ता दिला. त्यात काल जे पकडले गेले त्यात 5 कोटी दाखवले, झाडी आणि डोंगरातून बाकीचे 10 कोटी पोहचवण्यात आले. एकनाथ शिंदे प्रत्येक उमेदवारांना 50 कोटी दिले" असा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत म्हणाले, शिवसेनेचे आणि काँग्रेसचे नेते चर्चा करु आणि जागावाटप ठरवू, याची कुणी चिंता करु नका, कारण आमच्यात सर्व सुरळीत सुरु आहे आणि सर्व गोष्टी योग्य होतील.

एकनाथ शिंदेंनी उमेदवारांना ५० कोटी दिले - राऊत
संजय राऊत म्हणाले, "पुण्याच्या खेड शिवापूर रस्त्यावर काल दोन गाड्या होत्या. त्यात पंधरा कोटी होते. एकनाथ शिंदेंने सर्व उमेदवारांना पन्नास पन्नास कोटी रुपये दिले आहेत आणि त्याचा पहिला हप्ता पंधरा कोटींचा जात आहे हे मी सांगितलं होते. त्यातील सांगोल्याच्या आमदाराचे पंधरा कोटी पकडले गेले. पाच कोटींचा हिशोब दाखवला पण दहा कोटी सोडून दिले आहेत."
"मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरुन काॅल, प्रकरण दाबलं"
संजय राऊत म्हणाले, "एक काॅल येताच एक गोडी सोडली. टोलनाक्यावर एका पोलिस अधिकाऱ्याला पाठवण्यात आले होते. दीडशे उमेदवारांना पंधरा पंधर कोटी रुपये त्यांना पोहचले आहेत. पंधरा कोटी साधारण रक्कम नाही. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरुन काॅल आला आणि पुर्ण प्रकरण दाबले गेले. आमच्याकडे याचे पुरावे आहेत."
"निवडणूक आयोगावर दबाव"
संज राऊत म्हणाले, "पैसे, गाडी जप्त केली पण व्यक्तीला सोडून दिले गेले. मुख्यमंत्री कार्यालय हे सर्व मॅनेज करत आहेत. भाजपचे लोक निवडणूक आयोगासोबत मिळून मतदारांची नावे काढून टाकत आहेत. निवडणूक आयोग डोळ्यांची छापड लावून बसला आहे. निवडणूक आयोग कुणाच्या दबावाखाली आहे हे आम्हाला माहीत आहे." असेही राऊत यांनी म्हटलं आहे.
नांदगाव, श्रीगोंदा जागेवर दावा
संजय राऊत म्हणाले, बाळासाहेब थोरात मातोश्रीवर आल्यानंतर आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आज यादी येऊ शकते. नांदगाव आणि श्रीगोंदा मतदारसंघ आम्ही परंपरेने आम्ही लढत आलो आहोत. त्या जागी आम्ही लढणार आहोत.
राऊतांचा राणेंना टोला
संजय राऊत म्हणाले, आमचे लोक शिस्तबद्ध असून पक्षाचे लोक आदेश पाळत आहेत. कोकणात निलेश राणे हे शिवसेनेत प्रवेश करतील या चर्चेवर ते म्हणाले की, रावणालाही धनुष्य पेलता आले नाही ते छातीवर पडले असा टोला त्यांनी राणे यांना लगावला.












Click it and Unblock the Notifications