Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

भाजपचा शिलेदार शिंदेंच्या सेनेतून लढणार, पालघरमध्ये रंगणार सामना

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आल्या असून महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या घामासान रंगतदार स्थितीत पोहोचत आहे. महायुतीतील शिवसेना भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी कमालीचा समन्वय दाखवला असून जिंकून येऊ शकतील अशा जागी आपल्या कार्यकर्त्यांची आणि उमेदवारांची देवाण-घेवाण केली आहे. विशेषतः शिवसेना आणि भाजपा यांच्यात ही देवाण-घेवाण काहीशी अधिक झाली आहे. पालघर जिल्हा या देवाणघेवाणीचा अधिक प्रभाव दिसत असून भाजपमध्ये असलेल्या राजेंद्र गावित यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करीत पालघर साठी तिकीट मिळवले आहे.

मूळचे नंदुरबार जिल्ह्यातील असलेले राजेंद्र गावित हे पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजातील प्रमुख नेते आहेत. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात त्यांनी आदीवासी विकास मंत्री म्हणून काम पाहिले. 2018 साली भाजप खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे पालघर लोकसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक झाली आणि पोट निवडणुकीत राजेंद्र गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश करून पक्षाचे तिकीट मिळविले आणि ते भाजपच्या तिकिटावर खासदार देखील झाले.

Rajendra Gavit

2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत निवडणुकीसाठी सोय म्हणून राजेंद्र गावित यांना शिवसेनेत प्रवेश देण्यात आला आणि शिवसेनेच्या तिकिटावर ते पुन्हा पालघरचे खासदार झाले. 2024 साली झालेल्या लोकसभा निवडणूक त्यांना तिकीट देण्यात आले नाही. त्यांच्या ऐवजी हेमंत सवरा हे भाजपच्या तिकिटावर विजयी झाले. लोकसभा निवडणूक संपल्यानंतर काही दिवसातच त्यांनी पुन्हा भाजपात प्रवेश केला. मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांना एकनाथ शिंदे यांनी आणि आपल्या पक्षात प्रवेश देऊन पालघरची उमेदवारी दिली आहे.

वाढवण बंदर पालघरसाठी वरदान

पालघर जिल्हा हा महाराष्ट्राच्या आणि देशाच्या दृष्टीने ही सर्वात महत्त्वाचा जिल्हा आहे. कारण 76 हजार कोटी रुपये खर्च करून जिल्ह्यात वाढवण येथे जगातील सर्वात मोठ्या बंदरापैकी एक बंदर बांधले जाणार आहे.केंद्र सरकारने या प्रकल्पाला मान्यता दिली असून, या बंदराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. या जिल्ह्यात तिसरा आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याचा संकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. एकट्या वाढवण बंदराच्या प्रकल्पामुळे पालघर जिल्ह्यात रोजगाराच्या हजारो संधी निर्माण होणार असून देशाच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराला हे गती येणार आहे.

महाराष्ट्राची भाग्यरेषा ठरलेला समृद्धी महामार्ग वाढवण बंदराला जोडला जाणार असून त्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. त्याशिवाय रिअल इस्टेट क्षेत्रातही मोठी गती येणार असून मागास म्हणून ओळखला जाणारा हा जिल्हा राज्याच्या विकासाचे इंजिन ठरणार आहे.

मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन

भारताच्या दृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेचा असलेला मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल कॉरिडॉर हा प्रकल्प देखील पालघर जिल्ह्यातून जातो. गुजरात मध्ये या प्रकल्पाच्या कामाला प्रचंड गती आली असून महाविकास आघाडी सरकारच्या काळात मात्र महाराष्ट्रातील प्रकल्पाचे काम थांबवण्यात आले होते. 2022 साली महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती दिली. या प्रकल्पाच्या माध्यमातून देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई अहमदाबादशी जोडली जाणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर देशातील पहिली हाय स्पीड रेल्वे लाईन हा बहुमान या मार्गाला मिळणार आहे. या प्रकल्पाला जपानचे आर्थिक सहाय्य असून मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन चा काही भाग समुद्राच्या खालून जाणार आहे. पालघर जिल्ह्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्वपूर्ण आहे.

दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे

1350 किलोमीटर लांबीचा आणि आठ पदरी दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे सध्या देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि देशाची राजधानी दिल्ली या महामार्गातून जोडला जाणार आहेत. भूसंपादनासह या मार्गाची किंमत एक लाख कोटी रुपये इतकी होत असून महामार्गाचा बहुतेक भाग पालघर जिल्ह्यातून जात आहे याचा मोठा फायदा पालघर जिल्ह्याला होणार आहे आणि या जिल्ह्याचे अर्थचक्र बदलून जाणार आहे.

मुंबई वडोदरा राष्ट्रीय महामार्गाची बांधणी ही पालघर जिल्ह्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. पायाभूत सुविधांचे प्रकल्प मोठ्या प्रमाणात पालघर जिल्ह्यातून असल्यामुळे हा जिल्हा महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे इथून प्रत्येक जागा महायुतीसाठी प्रतिष्ठेची आणि महत्त्वाचे आहे.

शासन आपल्या दारी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून शासन आपल्या दारी हा उपक्रम राज्यभरात राबविण्यात आला. राज्य सरकारच्या अनेक योजना लाभार्थींना एकाच ठिकाणी त्यांच्या जिल्ह्यात देण्यात आले. या योजनांचा स्थानिकांना सुलभतीने लाभ मिळावा अशी त्यामागची कल्पना होती. राज्य सरकारच्या 400 हुन अधिक योजनांचे लाभार्थी या उपक्रमाच्या अंतर्गत एकत्र येत असत. पालघर जिल्ह्यातील लाभार्थ्यांनाही शासन आपल्या दारी अंतर्गत योजनेचा लाभ देण्यात आला आहे.

महायुतीची स्थिती मजबूत

पालघर जिल्ह्यात महायुतीने अत्यंत सावधगिरीने पावले उचलत परस्पर उमेदवारांचे देवाण-घेवाण केली आहे. भाजपने गेले अनेक वर्षांपासून हा मतदारसंघ बांधला असून चिंतामण वनगा यांच्या कामामुळे ग्रामीण भागात पक्षाची पाळीमुळे घट्ट रुजली आहेत. राजेंद्र गावित यांनी ही दोन वेळा युतीसाठी हा मतदार संघ जिंकला आहे. आता हेमंत सावरा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे प्रसारासाठी पालघर मध्ये प्रचंड कष्ट घेतले हे सर्वश्रुत आहे. त्यामुळेच पालघर विधानसभा मतदारसंघ यांचे पारडे काहीसे जड आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+