Maharashtra Assembly Election 2024 : होय, महाराष्ट्रात 'या' चार कामांसाठी लांबली आचारसंहिता!
Maharashtra Assembly Election 2024 :दर 5 वर्षांनी मी महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणूक सोबत होते. पण, यावेळी महाराष्ट्रातील निवडणूक दोन महिने उशिरा होत आहे. पण, आता आचारसंहिता कधीही लागू शकते, असे सांगितले जात आहे. परंतु मुंबईतील चार महत्त्वाच्या विकासकामांचे भूमिपूजन झाले की आचारसंहिता लागेल, असा अंदाज आहे. या विकासकामांचा मुद्दा निवडणूक प्रचारात घेतला जाऊ शकतो.
या विकासकामांमध्ये मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खंडाळा बोगद्याची एक लेन, समृद्धी महामार्गावरील इगतपुरी ते आमणे हा ठाण्याला जोडणारा शेवटचा टप्पा, कोस्टल रोड वांद्रे ते वर्सोवाहून विरारपर्यंत विस्तारण्याचे प्रस्तावित आहे. या कामाचे भूमिपूजन आणि सीप्झ ते बीकेसीपर्यंत मेट्रो-3 भुयारी मार्गाचा शुभारंभ केल्यानंतरच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्रालय स्तरावर कामाला वेग आला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या प्रकल्पांचे दसऱ्याच्या मुहूर्तावर लोकार्पण करण्यात येणार आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसल्याने विधानसभेसाठी आतापासूनच मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. विविध विकासकामांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा निर्धार केला आहे. या पार्श्वभूमीवर प्रगतीपथावर असलेली कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी 2025 ला पूर्ण होणारी कामे कालावधी संपण्यापूर्वीच लोकार्पण करण्याची घाई सरकारला झाली आहे. त्यामुळे चार प्रस्तावित कामांची यादी तयार केली असून, त्यांचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
मुंबई ते पुणे द्रुतगती महामार्गावरील 23.5 मीटर रुंदीच्या भुयारी मार्गाची एक लेन, समृद्धी महामार्गावरील इगतपुरी ते आमणे हा 73 किलोमीटरचा ठाण्याला जोडणारा शेवटचा टप्पा, नरिमन पॉईंट ते वरळी सी लिंकला जोडणारा 1.6 किलोमीटरचा पूल, कुलाबा ते सीप्झ मेट्रो-3 भुयारी मार्ग या कामांचा यात समावेश आहे. पंतप्रधान जम्मू-काश्मीर, हरयाणा राज्यातील निवडणुकीच्या प्रचारामुळे 8 ऑक्टोबरपर्यंत व्यस्त आहेत. त्यामुळे दसऱ्याचा मुहूर्त राज्यातील प्रकल्प कामांच्या शुभारंभासाठी काढले आहे. त्यानंतर आचारसंहिता लागू होणार असल्याचे समजते.
आठ पदरी रस्ता होणार
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बोरघाटातील सहा किलोमीटर वळणाच्या मार्गावर खालापूर टोल ते खोपोली एक्झिटपर्यंत आठपदरी रस्ता होणार आहे. या मार्गावर दोन बोगदे तयार केले जाणार आहेत. बोगद्याची रुंदी २३.५ मीटर इतकी असून, मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या एक किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे अनावरण करण्यात येणार असल्याचे समजते.
चार कामे अशी
1. मेट्रो वाहिनीचे उद्घाटन आचारसंहितेपूर्वी
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने आरे रोड ते कफ परेड या मेट्रो वाहिनी ३ च्या कामाला सुरुवात झाली आहे. अद्याप या वाहिनीचे संपूर्ण काम पूर्ण झाले नाही, तरी पहिल्या टप्यातील वाहिनीच्या कामाचे निवडणुकीच्या आचारसंहितापूर्वी उद्घाटन करण्याचा सरकारचा मानस असल्याची माहिती नगर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
2. मेट्रो-3 मार्ग
मेट्रो-3 मार्गावरील पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम शिल्लक आहे. आचार संहिता लागू होण्यापूर्वी गोरेगाव ते वांद्रे- कुर्ला कॉम्प्लेक्स या पहिल्या टप्प्यातील कामाचा शुभारंभ करण्याचा सरकारचा मानस आहे.
3. पुलाचे कामही होणार
नरिमन पॉईंट ते वरळी सी-लिंकला जोडणारा 1.6 किलोमीटरच्या पुलाचे मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. हा मार्ग पुढे वांद्रेपासून वर्सोवा आणि वर्सोवा ते विरारपर्यंत विस्तारित करण्यात येणार आहे.
4. समृद्धीचा शेवटचा टप्पा
समृद्धी महामार्गावरील इगतपुरी ते ठाण्यातील आमणे हा शेवटचा 73 किमी लांबीचा टप्पा येत्या सप्टेंबरअखेपर्यंत पूर्ण होणार आहे. या शेवटच्या टप्प्याचे 99 काम टक्के पूर्ण झाले आहे.












Click it and Unblock the Notifications