उद्धव ठाकरे विद्रोहींसोबत गेले, त्यांनी विश्वासघात केला! या महंतांचे मोठे वक्तव्य
मुंबई - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे विद्रोहींसोबत गेले, त्यांनी विश्वासघात केला, अशी टीका वक्तव्य महंत नारायणगिरी महाराज यांनी केली. तर शंकराचार्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना आशीर्वाद देण्याची गरज नव्हती. त्यांना आशीर्वाद देणे योग्यही नव्हते, असे वक्तव्य आचार्य प्रमोद कृष्णम् यांनी केले आहे.
माध्यमांशी संवाद साधताना आचार्य प्रमोद कृष्णम् तसेच महंत नारायणगिरी महाराज यांनी हे वक्तव्य केले आहे.

काय म्हणाले आचार्य प्रमोद कृष्णम् ?
आचार्य प्रमोद कृष्णम् म्हणाले, छत्रपती शिवरायांच्या विचारधारेसोबत ज्यांनी विश्वासघात केला, ज्यांनी सनातन, हिंदुत्व, विचारधारेशी विश्वासघात केला, ज्यांनी वीर सावरकरांच्या, बाळासाहेब ठाकरेंच्या विचारधारेसोबत विश्वासघात केला त्याबद्दल शंकराचार्यांनी सांगायला हवे.शंकराचार्यांनी यावर प्रकाश टाकायला हवा. मला विश्वास आहे की, शंकराचार्य यावर बोलतील.
महंत नारायणगिरी महाराज काय म्हणाले?
महंत नारायणगिरी महाराज म्हणाले, आपण कुणाला विश्वासघाती म्हणायला हवे, आपण कुणाला धोकेबाज म्हणायला हवे हे विचारपूर्वक बोलायला हवे. शंकराचार्य आमचे ते आदरणीय आहे. त्यांचा आम्ही सन्मान करतो. पण उद्धव ठाकरे विद्रोहींसोबत उद्धव ठाकरे मिळाले. त्यांना मातोश्रीवर जाऊन शंकराचार्यांनी आशीर्वाद देण्याची गरज नव्हती. ते योग्य नाही.
काय आहे प्रकरण
उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी शंकराचार्यांची पाद्यपूजा करण्यात आली. त्यांना मातोश्रीवर शंकराचार्यांनी आशीर्वादही दिला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना शंकराचार्यांनी उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात झाला. विश्वासघाताने त्यांचा पक्ष फोडला असे त्यांनी म्हटले होते. ही अप्रत्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका होती. तर दुसरीकडे संजय राऊत यांनी शंकराचार्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, मन मोकळे केले असे म्हटले होते.
काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊत म्हणाले की, न्यायालयामध्ये आमचा शिवसेना पक्ष, चिन्हाबाबत खटला सुरू आहे. तो चालेल तेवढा चालेल. पण आदरणीय शंकराचार्यांनी आम्हाला आशीर्वाद दिले. आमच्यावरील अन्यायाबाबत खंत व्यक्त केली. ते मातोश्रीवर आले त्यावेळी पक्षप्रमुखांनी रितीरिवाज आणि मोठ्या श्रद्धेने त्यांची पाद्यपुजा करुन आशीर्वाद घेतले आहेत. शंकराचार्य हे हिंदू धर्मात सर्वोच्च आहेत, त्यांचे म्हणणे खूप महत्त्वाचे आहे.
काही जणांना पोटशूळ!
संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्याबाबत विश्वासघात झाला. हिंदू धर्मात विश्वासातघात, फसवणुकीला थारा नाही. मुख्यमंत्रीपदावरुन विश्वासघाताने त्यांना दूर केले. पक्ष फोडला, असे हिंदू धर्माचे सर्वोच्च धर्मगुरु शंकराचार्य सांगतात. त्यामुळे काही जणांना त्यांनी हे सांगताच पोटशूळ उठला आहे, शंकराचार्या्च्या वक्तव्यावर टिकाटिप्पणी होत असेल, तर टीका करणाऱ्यांना हिंदुत्व मान्य नाही असा याचा अर्थ होतो.












Click it and Unblock the Notifications