सभागृहातील शिवीगाळ भोवली, अंबादास दानवे यांच्यावर निलंबनाची कारवाई
मुंबईः काल १ जुलै सोमवारी संसदेच्या अधिवेशनामध्ये राहुल गांधी यांनी हिंदू धर्माबाबत केलेल्या विधानाचे पडसाद महाराष्ट्राच्या विधिमंडळातही उमटले. महायुतीच्या आमदारानी विधानसभा आणि विधानपरिषद अशा दोन्ही सभागृहात राहुल गांधीच्या विधानाचा निषेध करत या मुद्द्यावरून महाविकासआघाडीला धारेवर धरलं.
विधानपरिषेदत भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याच पहायला मिळालं. यावेळी अंबादास दानवे यांनी आक्रमक पवित्रा घेत लाड यांना अपशब्द वापरले. त्यामुळे अंबादास दानवे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी महायुतीच्या आमदारांकडून केली जात होती.

आज २ जुलै मंगळवारी अखेरीस अंबादान दानवे यांचे ५ दिवसांसाठी निलंबन करण्यात आले आहे. विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी ही कारवाई केली आहे.
विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे पाच दिवसांसाठी निलंबन केले आहे. त्यामुळे आता अंबादास दानवे यांना पाच दिवस विधानपरिषदेत उपस्थित राहता येणार नाही. अंबादास दानवे यांचे निलंबन झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांविरोधात आक्रमक झाले.
यानंतर नीलम गोऱ्हे यांनी विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलण्याच्या परवानगी दिली असता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले आणि त्यांनी आक्षेप घेतला. यानंतर विरोधकांना संधी न देता पुढील कामकाज सुरु करण्यात आले.
विधान परिषदेत अंबादास दानवे आणि भाजप नेते प्रसाद लाड यांनी एकमेकांना शिवीगाळ केली. त्यानंतर सभागृहात गदारोळ झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना दानवेंनी लाड यांना दम भरला होता. माझ्यावर कोणी बोट उचललं तर मी त्याचा बोट तोडून टाकण्याची ताकद माझ्या मनगटात आहे, असल्यांचं वक्तव्य केलं होतं. त्यावरून आज कारवाई करत दानवेंचं ५ दिवसांचं निलंबन करण्यात आलं.












Click it and Unblock the Notifications