बिष्णोई गँगमध्ये 700 शुटर्स! 12 राज्यात नेटवर्क दाऊदची जागा घेत मुंबईत पाय रोवण्याचा प्रयत्न आहे का?
Lawrence Bishnoi Gang : प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याचे चिंकारा काळवीट प्रकरण समोर आले, तेव्हा लाॅरेन्स बिष्णोई गँग चर्चेत आली. या गँगच्या निशाण्यावर कुणी सामान्य नाही तर थेट सेलिब्रेटी असतात. त्यामुळे ही गँग दाऊद इब्राहिमच्या गँगसारखीच खतरनाक आहे हे दिसून येत आहे.
दुसरी गोष्ट अशी की, कालच या गँगने सलमान खान याला मदत करतो म्हणून महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या केली. त्यामुळे ही गँग पुन्हा चर्चेत आली आहे.

..म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या
प्रश्न हा आहे की, बाबा सिद्दीकी यांना का मारले ते..याचा तपास करत असताना लोणकर नावाच्या एका तरुणाने सोशल मीडियावर एक पोस्ट केली त्यात या हत्येची जबाबदारी बिष्णोई गँगने घेतल्याचे जाहीर केले. या पोस्टनंतर संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. पोस्टमध्ये सलमान खानसोबत युद्ध करायचे नव्हते पण त्याने ते भाग पाडले. जो सलमान खानला मदत करेल त्याची नोंद आमच्या पुस्तकात राहील असेही त्याने नमूद केलेले आहे. त्यामुळे बिष्णोवई गँगचे नेटवर्क कुठे-कुठे आहे हे दिसून येते.
बिष्णोई गँगची एनआयएकडून दाऊदशी तुलना?
असे सांगण्यात येत आहे की, लाॅरेन्स बिष्णोई गँगचे नेटवर्क देशातील बारा राज्यात आहेत. या गँगमध्ये जवळपास सातशे शुटर्स आहेत. लाॅरेन्स बिष्णोई, गोल्डी ब्रार यांचे फोटो सोशल मीडियावर टाकुन युवकांना आपल्या गँगसाठी आकर्षित केले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. लांगुलचालन करुन युवकांना विदेशात सेटल करण्याचे आमिषही दिले जात असल्याचे बोलले जात आहे. विशेष बाब म्हणजे राष्ट्रीय तपास संस्था एनआयए ने लाॅरेन्स बिष्णोई गँगची तुलना दाऊद इब्राहीमशी केली आहे.
काय म्हटले एनआयने आपल्या आरोपपत्रात?
या संस्थेने आपल्या दोषारोपपत्रात म्हटलं की, बिष्णोई गँगचे जाळे अभुतपुर्व पसरले आहे. हे असे जसे नव्वदीच्या दशकात अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहीमने छोटे छोटे गु्न्हे करत नेटवर्क उभे केले होते. टारगेट किलिंग, खंडणी वसुली रॅकेटद्वारे त्याने गुन्हेविश्वात पाऊल ठेवले होते.
मुंबईवर राज करायचा आहे का?
बिष्णोई गँगने सलमानला वारंवार ठार मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत यादरम्यान त्यांनी सिद्धु मुसेवाला या कलाकाराची हत्या केली होती. तो सेलिब्रेटी होता. त्यानंतर आता बाबा सिद्दीकीसारख्या दिग्गजाची हत्या केली आहे. ही गँग पंजाब हरियानासोबतच उत्तर भारतात पसरली आहे.
आता ही गँग महाराष्ट्रात पाय रोवण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे. खासकरुन मुंबईत दाऊद इब्राहिमची जागा त्यांना घ्यायची आहे का हा प्रश्न आहे तर बाॅलीवुड कलाकारांना टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे का हे येणाऱ्या काळात ठोस सांगता येईल.












Click it and Unblock the Notifications