Latur News : लातूर जिल्ह्यात भीषण अपघात! दुचाकी-जीप अपघातात निलंग्यातील पती-पत्नीसह मुलगा ठार
Latur News two-wheeler jeep accident : लातूर जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. मृतात पती-पत्नीसह मुलाचा समावेश आहे. निलंगा तालुक्यात हा अपघात घडला.
लातुर ते हुमनाबाद या महामार्गावर हलगरा शिवारात एका मोटार सायकल आणि क्रुझर जीपचा भीषण अपघात झाला. यामध्ये दुचाकीवरील तिघा जणांचा जागीच मृत्यू झाला. निलंगा निलंगा शहरातील शिवाजीनगर भागात राहणारे 65 वर्षीय काशिनाथ शंकर कांबळे, त्यांची 60 वर्षीय पत्नी जिजाबाई काशिनाथ कांबळे आणि मुलगा 42 वर्षीय कुमार काशिनाथ कांबळे अशी दुचाकी वरील तिघा मृतांची नावे आहेत.

कसा झाला अपघात?
कांबळे यांच्या मोटरसायकलला भरधाव वेगात येणाऱ्या क्रुझर जीपची धडक बसली. या अपघातात दुचाकीवरील तिघांचाही जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी पोलीस ठाण्यात क्रुझर जीप चालकाविरोधात निष्काळजीपणे जीप चालवून अपघात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास औराद शहाजनी पोलीस करत आहेत.
निलंग्यात हळहळ
जीप-दुचाकी अपघातात एकाच घरातील दाम्पत्य आणि त्यांचा मुलगा गतप्राण झाला. या घटनेने कांबळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान मृतांची उत्तरीय तपासणी झाल्यानंतर पुढील प्रक्रीया सुरु झाली आहे.
लातूरच्या स्कूलमध्ये मनसेचे खळखट्याक ! केली तोडफोड
लातूर शहरात गेल्या दोन वर्षापासून नारायणा ई-टेक्नो स्कूल ही शाळा सुरू आहे. या शाळेला शिक्षण विभागाची कसलीही मान्यता नसतानाही शाळा सुरू होती. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं अनेकवेळा निवेदने देवून आंदोलन केले होते. मात्र शिक्षण विभाग व पोलीस प्रशासन या शाळेवर काहीही कार्यवाही करायला तयार नसल्यामुळे मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष किरण चव्हाण व कार्यकर्त्यांनी शाळेची तोडफोड करीत खळखट्याक आंदोलन केलं आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ही बाब शिक्षण विभागाच्या निदर्शनास आणून देखील नारायणा ई-टेक्नो शाळेकडून पालक व विद्यार्थ्यांची दिशाभूल केली जात होती असा आरोप आहे. मनसेच्या निवेदनावरून शिक्षण विभागाने या शाळेला भेट देऊन चौकशी केली असता ही शाळा शासनाची कसलीही मान्यता नसतानाही सुरू असल्याचे शिक्षण विभागाच्याही निदर्शनास आले असल्याचे बोलले जात आहे.
यावरून शिक्षण विभागाने दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी सदरील शाळेला अनधिकृतपणे सुरू असलेली ही शाळा तात्काळ बंद करावी तसेच शाळेत नवीन प्रवेश घेऊ नयेत व ज्या विद्यार्थ्यांचे या शाळेत प्रवेश घेतले गेले आहेत त्यांना जवळच्या शाळेत स्थलांतरित करावे असे सक्त आदेश देऊन शाळेला दंड ठोठावला होता.तरीही या शाळेच्या शाळा व्यवस्थापनाने ही शाळा सुरूच ठेवली व नवीन प्रवेश प्रक्रियाही सुरू ठेवत प्रत्येक विद्यार्थ्यांकडून 75 हजार ते एक लाख रुपये फीस आकारून प्रवेश देणे ही सुरू होते. शिक्षणाधिकारी लातूर यांनी नारायण ई टेक्नो स्कूल ही शाळा अनधिकृत असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशा आशयाचे पत्रही लातूरच्या शिवाजीनगर पोलिस स्टेशन दिले होते. मात्र तरीही याबाबत शिक्षण विभाग आणि पोलिस कारवाई करीत नसल्यामुळे हे आंदोलन केल्याचे मनसेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.












Click it and Unblock the Notifications