लाडकी बहिण योजनेतील अपात्र महिलांच्या खात्यातील रक्कम सरकार काढून घेणार की नाही? अजित पवारांचे उत्तर
Ladki Bahin Yojana : राज्यात लाडकी बहिण योजना एकीकडे लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच यात काही अपप्रवृत्ती घुसल्याचे वेळोवेळी स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे राज्य सरकारने लाडक्या बहिणींच्या अर्जाची पुर्नपडताळणी सुरु केलेली आहे. पडताळणीत अनेक महिलांकडे कार, अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न आणि इतर गोष्टी आढळल्या. नुकत्याच केलेल्या पडताळणीत दोन हजारांवर सरकारी कर्मचारीही या योजनेसाठी नोंदणी केल्याचे स्पष्ट झाले आहे.
लाडकी बहिण योजनेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे या गोष्टीवरुन स्पष्ट होते. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनीही आज यासंदर्भात पत्रकारांसमोर जाहीर कबुली दिली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील नोंदणी केलेल्या महिलांच्या अर्जांच्या पडताळणीचे काम सुरु आहे आणि गरजू आणि पात्र महिलांना या योजनेचा लाभ दिला जाईल असे अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. त्यामुळे ज्या महिला पडताळणीत अपात्र ठरल्या आहेत त्यांचे पुढे काय आणि त्यांना आजपर्यंत मिळालेल्या रकमेचे काय होणार? आता प्रश्न हा आहे.
सरसकट दिला योजनेचा लाभ आता पुढे काय?
राज्यात लाडकी बहिण योजनेते अपात्र असतानाही पात्र असल्याचे भासवून या योजनेचा लाभ मिळवल्याचे समोर आले आहे, तसेच काहींनी अवैधपणे या योजनेत शिरकाव करत रक्कमेचा लाभ घेतला असल्याचे समोर आले होते. तरीही राज्य सरकारने तेव्हा पडताळणी न करता सरसकट योजनेचा लाभ दिला होता. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहिण योजनेवरुन एक मोठे विधान आज केले आहे.
हेही वाचा : ला Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार? जाणून घ्या अपडेट
अजित पवारांची कबुली..
आज पत्रकारांशी बोलताना अर्थमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहिण योजनेवरुन आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, "लाडकी बहिण योजनेतील अपात्र महिलांची अनेक प्रकरणे समोर येत आहेत, या योजनेत अनेक चुका झाल्या आहेत. सरसकट सर्वांना लाभ देणे चुकीचे होते " अशी कबुली त्यांनी दिली.
हेही वाचा : खूशखबर! लाडक्या बहिणींना 'या' सणाच्या दिवशी मिळणार हप्ता! 2 महिन्याचे एकत्र पैसे मिळतील का? वाचा
आता अपात्र महिलांच्या खात्यातील पैशांचे काय होणार?
लाडकी बहिण योजनेचा ज्या महिलांना सरसकट लाभ मिळत होता अशा महिलांच्या अर्जाची पडताळणी केली असता अनेकजणी अपात्र ठरलेल्या आहेत, आता त्यांना प्राप्त झालेल्या गेल्या कित्येक महिन्यांच्या हप्त्यांद्वारे मिळालेल्या पैशांचे काय होणार हा प्रश्न आहे. त्यावर अजित पवार यांनी थेट भूमिका घेत स्पष्टता दिली आहे.
नेमके काय म्हणाले अजित पवार ?
महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अजित पवार म्हणाले, "लाडकी बहिण योजना लागू केली तेव्हा निवडणुकीमुळे अर्ज पडताळणीसाठी कमी अवधी होता. निवडणूक आणि आचारसंहितेमुळे अर्ज तपासता आले नाही तेवढा वेळही मिळाला नव्हता. कमाल मासिक उत्पन्न 20 हजार आणि कमाल वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपर्यंत असलेल्या महिला या योजनेसाछठी पात्र होत्या, पण काही महिला पात्र ठरत नसतानाही त्यांनी या योजनेसाठी अर्ज करुन आर्थिक लाभ मिळवला, त्यांचे पैसे घेण्याचा प्रश्न नाही; परंतु यापुढे त्यांना मदत मिळणार नाही केवळ पात्र महिलांनाच मदत मिळेल. " हे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.


Click it and Unblock the Notifications
