Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

खूशखबर! लाडक्या बहि‍णींना 'या' सणाच्या दिवशी मिळणार हप्ता! 2 महिन्याचे एकत्र पैसे मिळतील का? वाचा

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रात लाडकी बहिण योजनेचे जवळपास दोन कोटींवर लाभार्थी आहेत. आगस्ट 2024 पासून लाडक्या बहि‍णींच्या खात्यात पैसे यायला सुरुवात झाली आहे. या योजनेचा लाभ दीड हजार रुपयांच्या स्वरुपात दिला जात असून राज्यात ही योजना खूपच लोकप्रिय झाली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू आणि होतकरु, गरीब महिलांचे उत्थान व्हावे, त्यांना सन्मान मिळावा, त्यातून त्यांची आवश्यक गरजेची कामे व्हावी यासाठी ही योजना महाराष्ट्रात महायुती सरकारने कार्यान्वित केली आहे. आता या योजनेचे महाराष्ट्रात जवळपास दोन कोटींवर लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना यावेळेचा मे 2025 चा हप्ता मिळालेला नाही. तो कधी मिळणार हा प्रश्न लाभार्थी विचारत आहेत. राज्य सरकार वटपोर्णिमेपर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे देण्यास सुरुवात करणार असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.

Ladki Bahin Yojana

कधी मिळणार लाडक्या बहि‍णींना हप्ता...

लाडक्या बहि‍णींना मे महिन्याच्या हप्त्यांसंदर्भात काही अपडेट्स आले आहेत, लाडक्या बहि‍णींच्या खात्यात विशिष्ट मुहुर्तावर पैसे जमा होणार असल्याची चर्चा आहे. प्राप्त माहितीनुसार, राज्य शासनाकडून अद्याप तरी मे महिन्याच्या हप्त्यासंदर्भात कोणतीही घोषणा झालेली नाही तरीही काही सुत्रांकडून महत्वाची तारीख समोर आली आहे.

Take a Poll

लाडक्या बहि‍णींना येत्या 10 जून 2025 पर्यंत योजनेचा हप्ता मिळेल अशी शक्यता आहे. कारण आतापर्यंत सरकारने लाडक्या बहि‍णींना त्या-त्या महिन्यात आलेल्या अथवा दोन महिन्यांचे एकत्र हप्त्याची रक्कम सणाच्या मुहुर्तावर अथवा सणाच्या निमित्ताने वितरीत केली आहे. या महिन्यात दहा जूनला वटपोर्णिमा आहे, त्यामुळे या दिवशी लाडक्या बहि‍णींच्या खात्यात सरकार थेट रक्कम टाकू शकते.

दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र मिळणार का?

लाडक्या बहिणींकडून मे आणि जून महिन्यांचे दोन हप्ते एकावेळी मिळतील का असे प्रश्न केले जात आहेत, मात्र सरकार दोन्ही महिन्यांचे एकत्रित तीन हजार रुपये लाडक्या बहि‍णींच्या खात्यात वटपोर्णिमेच्या मुहुर्तावर जवळपास टाकू शकते. पण सरकारी पातळीवर यासंदर्भात अधिकृत दुजोरा प्राप्त झालेला नाही.

दर महिन्याला दिले जातात दीड हजरा रुपये

महाराष्ट्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेत राज्यातील जवळपास दोन कोटींहून अधिक लाभार्थी महिला आहेत, त्या या योजनेच्या लाभार्थी असून त्यांना दर महिन्याला प्रत्येकी पंधराशे रुपये दिले जातात. महिलांचे सक्षमीकरण, उत्थान आणि मिळालेल्या पैशांतून त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न आहे.

लाभार्थ्यांच्या पडताळणी सुरुच

महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी "लाभार्थ्यांची पडताळणी" सुरुच असल्याचे म्हटले आहे. "लाभार्थ्यांची पडताळणी ही कोणत्याही योजनेच्या अंमलबजावणीतील सर्वसाधारण व नियमित प्रक्रिया आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीतही ही प्रक्रिया राबवली जाते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ योग्य लाभार्थ्यांनाच देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून, यासाठी अर्जांची पडताळणी ही नियमितपणे चालणारी प्रक्रिया असणार आहे." असे त्या म्हणाल्या.

"या पडताळणी प्रक्रियेत सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. त्यानुसार जवळपास दोन लाख अर्जांची पडताळणी केल्यानंतर त्यात सुमारे 2289 सरकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नावनोंदणी केल्याची बाब जानेवारी- फेब्रुवारी दरम्यानच लक्षात आली असून तेव्हापासून अशा व्यक्तींना कोणताही लाभ वितरित करण्यात आलेला नाही. हेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+