कोल्हापूर हादरले! लग्नाच्या बेडीऐवजी मृत्यूचा फास; राधानगरीच्या जंगलात प्रेमीयुगुलाचा करुण अंत
Kolhapur crime news :"प्रेम आंधळं असतं" असं म्हटलं जातं, पण याच प्रेमाची परिणती जेव्हा मृत्यूमध्ये होते, तेव्हा संपूर्ण समाज सुन्न होतो. कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील तरसंबळे परिसरातून अशीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका २८ वर्षीय तरुणाने आणि १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने राधानगरीच्या घनदाट जंगलात एकाच दोरीने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.

नेमकी घटना काय?
शेळेवाडी येथील ओंकार उर्फ उदय कृष्णात बरगे (वय २८) आणि तरसंबळे येथील एक १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होते. गुरुवारी तरसंबळे येथील जंगल परिसरातील मुख्य रस्त्यापासून अर्धा किलोमीटर आत एका शेतकऱ्याला दुर्गंधी आल्याने हा प्रकार उघडकीस आला. एकाच झाडाला, एकाच दोरीने या दोघांनी गळफास घेतलेला पाहून परिसरात खळबळ उडाली.
४ दिवसांनंतर मृतदेह सापडले
पोलिसांच्या अंदाजानुसार, ही घटना साधारण चार दिवसांपूर्वी घडली असावी. मृतदेह चार दिवस झाडाला लटकलेल्या अवस्थेत असल्याने परिसरात मोठी दुर्गंधी पसरली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील गुरुनाथ कांबळे यांनी राधानगरी पोलिसांना पाचारण केले. मृतदेहांची अवस्था पाहता, रात्री आठच्या सुमारास घटनास्थळीच शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले.
कष्टाळू तरुण आणि अपूर्ण स्वप्ने
आत्महत्या केलेला ओंकार हा परिसरात अत्यंत मनमिळाऊ आणि कष्टाळू मुलगा म्हणून ओळखला जात असे. त्याचा बिद्री साखर कारखान्याला ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर व्यवसाय होता. गावातील यात्रेमध्ये १०० किलोची गुंडी उचलून फेऱ्या मारणारा एक बलदंड तरुण अशी त्याची ओळख होती. एवढ्या कष्टाळू तरुणाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले? याबाबत परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. ओंकारच्या पश्चात आई, वडील आणि धाकटा भाऊ असा परिवार आहे.
आत्महत्येचे कारण: प्रेमप्रकरण की सामाजिक दबाव?
प्राथमिक तपासानुसार, हे प्रकरण प्रेमप्रकरणातून घडल्याचे समोर आले आहे. मुलगी अल्पवयीन (१७ वर्षे) होती आणि ओंकारचे वय २८ वर्षे होते. वयातील अंतर आणि सामाजिक अडथळ्यांमुळे लग्नात येणाऱ्या अडचणींना कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलले असावे, अशी चर्चा परिसरात सुरू आहे. मात्र, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.












Click it and Unblock the Notifications