आता एकत्र येणार हे नक्की... पण राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांच्यातला वाद नेमका काय होता? वाचा इतिहास
कुठलीही गोष्ट डोळ्यासमोर ठेवली तर आमच्यातला वाद किरकोळ आहे. महाराष्ट्र खूप मोठा आहे. या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी आमच्यातील वाद व बाकी गोष्टी शुल्लक आहे, असं वक्तव्य राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या वादाबाबत केलं होतं. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे अप्रत्यक्षपणे हात पुढे केला होता. त्यानंतर अचानक महाराष्ट्रातील वातावरण बदललं. उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे एकत्र येतील, अशी शक्यता वाढली आहे. परंतु यानिमित्ताने बाळासाहेबांची शिवसेना व राज-उद्धव यांच्यातील वाद नेमका काय होता? या चर्चा पुन्हा सुरु झाल्या. याच वादाचा इतिहास आपण पाहूयात...

कसं सुरु झालं वैर?
राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्यातील वैर खऱ्या अर्थानं १९९५ मध्ये सुरु झालं. राज ठाकरे यांच्याकडे शिवसेनेची जबाबदारी घेण्यासाठी आवश्यक असणारे सर्व गुण होते. मात्र काका बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची सुत्रे उद्धव यांच्या हातात दिली. उद्धव ठाकरे याच वर्षी शिवसेनेत सक्रीय झाले. १९९७ मध्ये मुंबई बीएमसीच्या निवडणुका लागल्या. यावेळी तिकीट वाटपाची सर्व जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी हाताळली. राज यांच्या निर्णयाला त्यावेळी कमी महत्त्व दिले गेले. त्या निवडणुकीत शिवसेनेने प्रचंड विजय मिळवला आणि उद्धव ठाकरेंचे शिवसेनेतील वजन वाढले.

शिवसेनेतील गटबाजी वाढली
उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची सूत्रे हाती घेतल्यानंतर राज ठाकरे व त्यांच्या गटाचे अस्तित्व नाममात्र राहिल्यासारखे झाले. राज व उद्धव यांच्यातील अंतर्गत मतभेद वाढू लागले. शिवसेनेने उद्धव ठाकरे यांना कर्णधार म्हणून अधिकृतपणे स्विकारले होते. त्यानंतर राज ठाकरे यांची चलबिचल वाढली. २००३ मध्ये राज ठाकरे यांनी महाबळेश्वर येथील मेळाव्यात उद्धव ठाकरे यांना राष्ट्रपती करण्याचा प्रस्ताव मांडला. परंतु उद्धव ठाकरे शिवसेनेत अॅक्टीव्ह राहिले. त्यानंतर राज ठाकरे जास्त बाजूला जावू लागले.

वेगळा पक्ष स्थापन केला
२००६ साली राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली. त्यानंतर त्याच वर्षी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा नवा पक्ष स्थापन केला. २००९ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मनसेने महाराष्ट्रात १३ जागा जिंकल्या. तर २४ जागांवर ते दुसर्या स्थानी राहिले. त्यानंतर २००९ च्या निवडणुकांत त्यांना यश मिळाले नाही. २०१४ च्या निवडणुकीतही त्यांना फक्त एक जागा जिंकता आली. मनसेची कामगिरी खालावत गेली तशी उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांची मने जास्त दुभंगत गेली.

हत्या प्रकरणात आले नाव
त्यापूर्वी १९९६ ला रमेश किणी हत्या प्रकरणात राज ठाकरे यांचे नाव आले होते. शिवसेनेच्या लोकांना रमेश किणी यांचा प्लॅट हवा होता. त्यातून रमेश किणी यांना धमकी देण्यात आली होती. त्यानंतर रमेश किणी यांचा मृतदेह एका सिनेमा थिएटरजवळ सापडला. रमेश यांच्या पत्नीने राज ठाकरे यांच्यावर हत्येचा आरोप केला. या प्रकरणाची सीबीआयने चौकशी केली परंतु राज ठाकरे यांना निर्दोष मुक्त करण्यात आले. या प्रकरणात राज ठाकरे यांचे नाव आल्यापासून शिवसेनेत त्यांची उलटी गिणती सुरु झाली होती, असे सांगितले जाते.












Click it and Unblock the Notifications