Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

दिवंगत अनिल बाबर यांचा समर्थ वारस 'सुहास बाबर'

सांगली जिल्हा महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील सर्वात महत्त्वाचा आणि संवेदनशील जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्याचे राजकारण मुख्यत्वे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या भोवती फिरत राहिलेले आहे. मात्र काही ठिकाणी भाजपने यश मिळवले आणि शिवसेनेचाही फार उशिराने का होईना परंतु सांगली जिल्ह्यात प्रवेश झाला आहे. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, माजी महसूल मंत्री राजारामबापू पाटील, जयंत पाटील, आर आर पाटील, पतंगराव कदम, प्रतीक पाटील, विशाल पाटील, सुरेश खाडे अशी अनेक नावे सांगली जिल्ह्याच्या राजकीय पटावर चमकली. जिल्ह्याचा विचार करता खानापूर आटपाडी या दुष्काळी भागाचे प्रतिनिधित्व करणारे अनिल बाबर यांचे नाव घेतल्याशिवाय सांगली जिल्ह्याचा राजकीय इतिहास पूर्ण होऊ शकत नाही.

1972 साली वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी अनिल बाबर हे सांगली जिल्हा परिषदचे सदस्य झाले. 1981 मध्ये ते विषय समिती सभापती झाले. 1982 ते 1990 या काळात खानापूर पंचायत समितीचे अध्यक्ष म्हणून त्याने काम पाहिले. आणि 1990 साली महाराष्ट्र विधानसभेत आमदार म्हणून त्यांचा प्रवेश झाला. 1991 साली यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. 1999 साली ते पुन्हा आमदार झाले आणि 2001 साली सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर संचालक म्हणून त्यांची निवड करण्यात आली. 1999 ते 2008 या काळात ते राष्ट्रीय अवजड अभियांत्रिकी सहकारी लिमिटेडचे अध्यक्ष होते. 2014 आणि 2019 अशा दोन विधानसभा निवडणुकात शिवसेनेच्या तिकिटावर त्यांनी विधानसभेत प्रवेश केला.

Anil Babar Son Suhas Babar

दुष्काळी भागाचे प्रतिनिधी

खानापूर आटपाडी विटा हा सांगली जिल्ह्यातील परिसर अवर्षणग्रस्त परिसर म्हणून ओळखला जातो. सिंचनाच्या सुविधा नसल्यामुळे आणि कालव्यांची निर्मिती झालेली नसल्यामुळे येथील नागरिक मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करीत असतात. आपल्या संपूर्ण राजकीय हयातीत अनिल बाबर यांनी हा परिसर पाणीदार करण्यासाठी प्रयत्न केले. कृष्णा नदीचे पाणी आपल्या तालुक्यात खेळावे असाच त्यांचा प्रयत्न होता. 1972 पासून राजकीय क्षेत्रात अनुभवी असलेले अनिल बाबर यांना मोठ्या यशाने नेहमीच हुलकावणी दिली.2014 च्या देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागू शकली नाही. 2019 साली उद्धव ठाकरे त्यांना आपल्या मंत्रिमंडळात सहभागी करून घेतील, असा अंदाज होता. मात्र उद्धव ठाकरे यांनीही अनिल बाबर यांच्या मंत्रिपदाकडे दुर्लक्ष केले. 2022 साली एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडात अनिल बाबर यांनी शिंदेंना साथ दिली आणि बाबर हे एकनाथ शिंदे यांच्या गळ्यातील ताईत बनले. दुर्दैवाने अलीकडेच अनिल बाबर यांचे निधन झाले. त्यानंतर काही दिवसापूर्वी एकनाथ शिंदे या यांनी खानापूर आटपाडीचा दौरा केला होता त्यावेळी त्यांनी बाबर यांच्या स्मृतीस अभिवादन केले. बाबर यांच्या दोन्ही मुलांना आई-वडिलांची उणीव भासू देणार नाही, असा शब्द एकनाथ शिंदे यांनी दिला होता. एकनाथ शिंदे हे शब्द पाळणारे नेते म्हणून ओळखले जातात. आपल्या शब्दाला जागत खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातून शिंदे यांनी अनिल बाबर यांचे पुत्र सुहास बाबर यांना यांना संधी दिली आहे.

दुष्काळ हटविण्यासाठी प्रयत्न

मतदार संघातील दुष्काळ दूर करण्यासाठी अनिल बाबर यांनी अथक प्रयत्न केले. विटा शहरापासून 50 ते 60 किलोमीटर लांब बसलेल्या कृष्णा नदीचे पाणी खानापूर मध्ये आणण्याचा त्यांचा आग्रह होता. त्यातूनच टेंभू योजनेचा जन्म झाला. या योजनेच्या माध्यमातून अनिल बाबर यांचा दूरदर्शीपणा प्रकर्षाने दिसून येतो. आपल्या मतदारसंघातील रस्त्यांच्या विकासाकडेही अनिल बाबर यांचे विशेष लक्ष होते. त्यामुळेच सरकारकडे पाठपुरावा करून विटा माडगुळे, खरसुंडी पलूस, विटा मांजर्डे, खानापूर विसापूर या रस्त्यांसाठी बाबर यांनी भरीव निधी मंजूर करून घेतला होता.

मतदारसंघात विविध विकासकामे

खानापूर आटपाडी मतदारसंघातील केरा नदीवर पूल बांधण्यासाठी अनिल बाबर यांनी निधी मंजूर करून घेतला. या पुलाचे काम पूर्ण झाले असून विटा शहरातील शितोळे समाजातील नागरिकांची आपल्या श्रद्धास्थानी जाण्याची चांगली सोय झाली आहे. खानापूर आटपाडी मतदारसंघात पर्यटन विषयक सुविधा निर्माण करण्यासाठी बाबर यांनी 15 कोटी रुपयांचा निधी संमत करून घेतला तसेच दरगोबा मंदिराच्या नूतनीकरणासाठी 9 कोटी रुपयांचा निधी प्राप्त करून घेतला. हे मंदिर खानापूर गटापासून नऊ किलोमीटर अंतरावर आहे.

बहिर्जी नाईक यांच्या समाधीस्थळाचा विकास

छत्रपती शिवरायांच्या इतिहासात बहिर्जी नाईक यांचे स्थान मोलाचे आहे. महाराजांचे गुप्तहेर अशी इतिहासात बहिर्जी नाईक यांची नोंद आहे. खानापूर तालुक्यातील बानुरगड येथे बहिर्जी नाईक यांची समाधी आहे. या समाधीच्या विकासासाठी अनिल बाबर यांनी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला तसेच रेणावी या खानापूर तालुक्यातील महत्त्वाच्या गावातील रेवणसिद्ध मंदिराच्या नूतनीकरणासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला असून ही कामे प्रगती पथावर आहेत.

2024 च्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी अनिल बाबर यांचे पुत्र सुहास बाबर यांना खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातून रिंगणात उतरवले आहे. की त्याच्या कामाचा वारसा सर्वच राजकीय पक्षात असलेले सलोख्याचे संबंध आणि युवा नेतृत्व यामुळे सुहास बाबर हे एकनाथ शिंदे यांचा विश्वास सार्थ ठरवतील असा विश्वास शिवसैनिकांना वाटत आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+