त्यांचे मुंडके छाटले पाहिजे...राहुल सोलापूरकर वादावर कालिचरण महाराजांचे वादग्रस्त वक्तव्य
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर अभिनेते राहुल सोलापूरकर चर्चेत आले होते. या प्रकरणात सोलापूरकर यांनी माफीही मागितली. मात्र आता या वक्तव्यावरील कवित्व थांबता थांबत नाहीए. याच विषयावर आता कालिचरण महाराजांनी पुन्हा एकदा वादग्रस्त व्यक्तव्य केलंय. जे लोक अपमान करतील, त्यांची मुंडके छाटून कालीमातेला त्या मुंडक्याची माळ घातली पाहिजे, असं वक्तव्य कालिचरण महाराजांनी केले.

नेमके काय होते प्रकरण?
चार दिवसांपूर्वी ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त व्यक्तव्य केलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून लाच देऊन सुटले होते, असं त्यांनी म्हटलं होतं. इतकंच नाही तर पेटारे-बिटारे असं काहीच नव्हतंच. छत्रपती शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्र्याहून सुटून आले होते. त्यासाठी त्यांनी किती हुंडी वटवल्या, याचे पुरावे देखील आपल्याकडं आहेत, असंही सोलापुरकर एका मुलाखतीत म्हटले होते. शिवाजी महाराजांनी अगदी औरंगजेबाचा वजीर आणि त्याच्या बायकोला देखील लाच दिल्याचे पुरावेही इतिहासात आहेत, असं वक्तव्य केल्यानं त्यांच्यावर टीका झाली होती.
काय म्हणाले महाराज?
राहुल सोलापूरकर वादावर आज कालिचरण महाराज यांनी आपलं मत व्यक्त केलं. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि ज्या- ज्या महान पुरुषांनी हिंदुत्वाचे रक्षण केले त्यांचा जे लोक अपमान करतील त्यांची मुडके सर्व हिंदूंनी छाटली पाहिजेत. कालीमातेला त्यांच्या मुंडक्यांची माळ घातली पाहिजे. हिंदूंच्या महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना हाच दंड असतो. खास करुन ज्या लोकांना आत्महत्या करण्याची हौस आलेली आहे त्यांनी स्वतःच्या जीवनाचं सार्थक करुन स्वतःच्या मुंडक्या उतरवा आणि स्वतःचा जीव द्यावा. यातच हिंदूंचे कल्याण आहे, असे वादग्रस्त वक्तव्य कालीचरण महाराज यांनी केले.












Click it and Unblock the Notifications